घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2021 : जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला...

Maharashtra Assembly Budget Session 2021 : जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला – देवेंद्र फडणवीस

Subscribe

आपण कोरोनाची आकडेवारी दिली तर सत्य बाहेर येईल याच उद्देशाने राज्यपालांना सरकारकडून एखाद्या चौकात करतो तशाच स्वरूपाच भाषण देण्यात आले. यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक असू शकत नाही. कोरोना काळात केलेल्या तयारीसाठी राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेते, पण नेमके कोणते कार्यक्रम हाती घेतले याबाबत सरकार काहीच बोलत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकार येत्या दिवसात काय करणार आहे याचा उल्लेख होत नाही. या सगळ्या गोष्टींची साधी आकडेवारीही सरकारकडून मांडण्यात आली नसल्याची टीका विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना केली. राज्य सरकारने कोरोनाच्या कालावधीत प्रयोगशाळा किती उभारल्या माहिती नाही, कोविड सेंटर किती उभारले माहिती नाही, किती रूग्ण आले त्याची कल्पना नाही, किती क्षमता होती, किती लोकांना त्यामध्ये सामावून घेतले माहिती नाही. या जम्बो हॉस्पिटलचा किती लोकांना लाभ झाला, पेशंट नव्हे तर किती कंत्राटदारांना लाभ झाला, कोणाकोणाची घर भरली गेली याचाही लेखाजोखा दिला गेला असता तर अधिक चांगल झाले असते असे फडणवीस म्हणाले. (big scam in covid care center alleged devendra fadanvis)

औषध साधनसामुग्री किती दिली गेली याची माहिती नाही, महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ किती लोकांना दिली याबाबतची माहिती नाही. मंत्री महोदय सातत्याने योजनेत लाभ दिला असे सांगतात. पण प्रत्यक्ष माहितीच्या अधिकारात १० टक्के लोकांनाही योजनेचा लाभ झाला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आता या प्रकणात औरंगाबादच्या उच्च न्यायालयात केस दाखल झाली आहे. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे की तुम्ही जे म्हणत आहात ते दिसतच नाही. इतक्या लोकांची बिले समोर आहेत, तर नेमकी कोणाला याची मदत झाली असा सवाल खंडपीठाने विचारला आहे. किती लोकांचे प्राण वाचले तसेच किती लोकांना संक्रमित होण्यापासून वाचवण्यात आले याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. माझे कुटुंब माझी, जबाबदारी आता मीच जबाबदार. सरकारची काहीच जबाबदारी नाही, सरकार हाथ झटकून मोकळे आहे अशी टीका फडणवीस यांनी सरकारवर केली. आपली पाठ थोपटायला सरकार तयार आहे, पण इतर जबाबदारी मात्र तुम्ही घ्या असे सरकारचे म्हणणे आहे.

- Advertisement -

कोविडची परिस्थती

देशात १ लाख ५१ हजार १५७ इतके मृत्यू देशात झाले आहेत. महाराष्ट्रात ५२ हजार १८४ मृत्यू झाले आहेत. देशाच्या ३३ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहेत. आपण कशाची पाठ थोपटून घेत आहोत मला समजत नाही असे ते म्हणाले. आमच कौतुक डब्ल्यूएचओने केली आहे, डब्ल्यूएचओ काय करते हे हे राऊतांनी सांगितलेच आहे. त्यामुळे कंपाऊंडरचा सल्ला घ्यायचा, की डॉक्टरच्या सल्ला घ्यायचा हा प्रश्न मला विचारावासा वाटतो असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील रूग्णसंख्या २१ लाख ६१ हजार ४४७ इतकी आहे. अनेक काळ ही संख्या २५ टक्के ते ४० टक्के इतकी होती. देशाच्या रूग्णसंख्येच्या ३५ टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात असताना आपण कशाची पाठ थोपटून घेत आहोत असे त्यांनी विचारले. सक्रीय रूग्णांचे प्रमाण हे मार्च महिन्यात देशाच्या ४६ टक्के सक्रीय रूग्ण महाराष्ट्रात आहेत. आपण चाचण्याच कमी करतो आहोत. सप्टेंबरमध्ये आपण ८८ हजार चाचण्या करायचो. ऑक्टोबरमध्ये ७० हजार चाचण्या करतो. डिसेंबरमध्ये ६० हजार, जानेवारीत ६१ हजार आणि फेब्रुवारीत ५९ हजार अशा आपण चाचण्या कमी केल्या. चाचण्यांची संख्या कमी केली, तरीही संक्रमणाची परिस्थिती पहायला मिळते आहे. अमरावतीमध्ये पॉझिटीव्ह रूग्ण देण्याचे रॅकेट समोर आले, नवी मुंबईत चाचणी न करताच रूग्ण पॉझिटीव्ह झाले. रूग्णसंख्या खरोखर वाढली आहे का असाही सवाल त्यांनी केला.

कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाला

जम्बो कोविड सेंटरची पुस्तिका तयार, मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. यामध्ये खरे किती पेशंट होते, ५० टक्के पेशंट तरी खरे होते. तुम्ही करार कसे केले ? असा सवाल त्यांनी केला. अनेक लोकांना जम्बो कोविड सेंटर उघडण्याची मुभा आपण दिली, ते कोण आहेत, कोणाशी संबंधित आहे ते काढा. त्यामधून मोठी कुरणे तयार झाली. कोविड काळातला घोटाळा म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

असा आहे जम्बो कोविड घोटाळा 

निविदा न मागवता गाद्या, उशा ६० लाख रूपये खर्च
१२०० रूपयांचे थर्मामीटर ६५०० रूपयांमध्ये खरेदी केले
२ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख रूपये भाडे दिले
पंख्याचे ९० दिवसाचे भाडे ९ हजार रूपये दिले
१ हजार खुर्च्याचे भाडे ४.५ लाख रूपये
लाकडाच्या १५० टेबलचे भाडे ६ लाख ७५ हजार रूपये
डेडबॉडी बॅगचा घोटाळा झाला २५० रूपयांची बॅग ६७१९ रूपयांना घेतली
पीपीई किटचा घोटाळा झाला


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -