घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकर्नाटकात कॉंग्रेसचा मोठा विजय, नाशिकमध्ये थेट गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जल्लोष

कर्नाटकात कॉंग्रेसचा मोठा विजय, नाशिकमध्ये थेट गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जल्लोष

Subscribe

नाशिक : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभवची धुळ चारत ११५ जागांवर विजय मिळवला. कर्नाटकमध्ये मिळालेल्या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी काँग्रेसकडून विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकमध्येही काँग्रेसच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गॅस सिलेंडरला हार घालत २०२४ च्या निवडणुकीत या अग्नीमध्ये भाजपची सत्ता स्वाहा होउ दे अशी प्रार्थना करत अनोख्या पध्दतीने जल्लोष साजरा करण्यात आला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी स्वत: मैदानात उतरुन प्रचार केला होता. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकमध्ये रोड शो आणि जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र, स्टार प्रचारक आणि सर्व यंत्रणा पणाला लावूनही कर्नाटकमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. कर्नाटक निवडणुक प्रचारात श्रीराम आणि बजरंगबलीचा मुददा पुढे आणला गेला. मात्र श्रीराम आणि बजरंगबलीचा आर्शिवाद काँग्रेसच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकारयांनी व्यक्त केली. तसेच या निवडणुकीत महिलांचे सर्वाधिक मतदान झाल्याचे सांगण्यात येते. महागाईच्या मुददयावरून सध्या जनतेत सरकारविषयी नाराजी आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत त्यामुळे गॅस सिलेंडरला हार घालत २०२४ च्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन होउ दे असा संकल्प यावेळी करण्यात आल्याचे नाशिक महिला काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी महात्मा गांधी मार्गावरील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर ढोल ताश्यांच्या गजरात कर्नाटक निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

कर्नाटकात महागाई, बेरोजगारी आणि जातीय तेढ विरोधात मतदान झाली. भाजपच्या पतनाची सुरूवात कर्नाटकमधून झाली आहे. काँग्रेस पक्षाने भारत जोडो च्या माध्यमातून देश एकत्र करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढण्यात आली त्याचे उत्तर या निवडणुकीत मतदानातून जनतेेने दिले. भाजपने नेहमी सुडाचे राजकारण केले. काँग्रेसने या देशावर ६० वर्ष सत्ता केली. हा देश आजही गांधी कुटूंबियांच्या पाठीशी असल्याचे या निवडणुक निकालातून दिसून आले. : अ‍ॅड. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस

संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. कर्नाटकपासून ही सुरूवात झाली आहे. पुढे सर्व राज्यांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडून आल्याशिवाय राहणार नाही. केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर करून ज्या पध्दतीने हुकुमशाही या देशात सुरू आहे त्याच्याविरोधातला हा रोष कर्नाटकच्या निवडणुकीतून व्यक्त झाला. हुकूमशाही विरोधात देशातील जनता असल्याचे या निकालातून समोर आहे. २०२४ च्या विजयाची ही नांदी ठरेल. : डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -