घरताज्या घडामोडी'बिग बॉस' मराठी फेम अभिजित बिचुकलेंचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत

‘बिग बॉस’ मराठी फेम अभिजित बिचुकलेंचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत

Subscribe

'बिग बॉस' मराठी फेम अभिजित बिचुकले यांचा पुण्यात अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात अभिजित बिचुकले यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

‘बिग बॉस’ मराठी फेम अभिजित बिचुकले यांचा पुण्यात अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात अभिजित बिचुकले यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. अभिजित बिचुकले यांच्यासोबत त्यांच्या चार मित्रांनाही दुखापत झाले आहे. (Bigg Boss Marathi Hindi Fame Abhijit Bichukale Car Accident Four Friends Serious Injuries)

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या व्यवसायाच्या कामासाठी अभिजित बिचुकले हे पुण्यात आले होते. अपघातानंतर अभिजित बिचुकले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. अभिजित बिचुकले हे मुळचे साताऱ्याचे रहिवाशी आहेत.

- Advertisement -

अभिजित बिचुकले यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांची विचारपूस केली.

अभिजित बिचुकले यांनी बिग बॉसमधील आपल्या हटके स्वभावाने आणि शैलीने प्रेक्षकांचे अल्पावधीतच मन जिंकले होते. शिवाय, ते नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या मनोरंजन विश्वामध्ये अभिजित बिचुकले हे मोठे नाव आहे. हिंदी बिग बॉसमध्ये त्यांचा सहभाग आणि त्यामध्ये त्यांनी केलेली कामगिरी यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यत सगळ्यांवर बिनधास्तपणे बोलणारे अभिजित बिचुकले हे कायमच बातमीचा आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अभिजित बिचुकले यांचा अपघात कसा झाला याबाबत अजुन कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यांच्या मित्रांवर देखील उपचार सुरु आहेत. चाहत्यांनी अभिजितला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिकेतील स्वीकृतांची संख्या होणार 10, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -