घरदेश-विदेशविरोधकांकडून चेहरा शरद पवारांचा होऊ शकतो, नितीश कुमारांनी सांगताच, पवार म्हणाले...

विरोधकांकडून चेहरा शरद पवारांचा होऊ शकतो, नितीश कुमारांनी सांगताच, पवार म्हणाले…

Subscribe

शरद पवार हे विरोधकांचा चेहरा असू शकतात असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर पवार म्हणाले की, या सर्वबाबतीत निर्णय हा विचार करुन घेतला जाईल, बैठका घेतल्या जातील आणि मग ठरवलं जाईल, असं म्हटलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षनेते सतत एकमेकांना भेटून पुढील रणनीतीवर चर्चा करत आहेत, असं नितिश कुमार म्हणाले. तसंच, विरोधकांचा चेहरा कोण असणार यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची लोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची जमवाजमव करण्यासाठी भेट घेतली आहे.(  Bihar CM Nitish Kumar said that Sharad Pawar can be faced of the opposition Sharad pawar react )

यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितिश कुमार यांनी शरद पवार हे विरोधकांचा चेहरा असू शकतात असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर पवार म्हणाले की, या सर्वबाबतीत निर्णय हा विचार करुन घेतला जाईल, बैठका घेतल्या जातील आणि मग ठरवलं जाईल, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शरद पवार?

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. विरोधकांची मोळी बांधण्याची गरज आहे. महाराष्ट्रात देखील एकत्र काम करण्याची गरज आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यावर चर्चेची गरज नाही, आता चर्चा नको, असंही शरद पवार म्हणाले.

भाजपसमोर आव्हान

पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. या आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक मिळवता येईल का, हे भाजपसमोर आव्हान आहे. दुसरीकडे, भाजपच्या नेतृत्त्वाखालील युतीच्या बहुमताचा आकाडा आधी रोखून आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या रणनीतीवर विरोधक काम करत आहेत. मात्र, यात काँग्रेसची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

- Advertisement -

नैतिकता आणि भाजपचा काहीही संबंध नाही

नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी अधिक जोमाने काम करणार. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र भूमिका बांधली, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -