घरमहाराष्ट्रबिहार सरकारच्या जनगणनेची सत्यता पडताळणार - देवेंद्र फडणवीस

बिहार सरकारच्या जनगणनेची सत्यता पडताळणार – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबई : बिहार सरकारच्या जनगणनेमध्ये किती सत्यता आहे. हे पडताळून पाहणार आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जातनिहाय जनगणनावर दिली आहे. बिहार सरकारने आज जातनिहाय जनगणा जाहीर केली. या जाहीर झालेल्या अहवालातून बिहार लोकसंख्या 25.5 टक्क्यांनी वाढलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहे.

बिहारच्या जातनिहाय जनगणनावर दवेंद्र फडणवीस म्हणाले, “बिहार सरकारचे काही आकडे आता बाहेर येत आहेत. बिहार सरकारने अजून सगळा रिपोर्ट जाहीर केलेला नाही. आम्ही बिहार सरकारचा रिपोर्ट पाहणार आहोत आणि त्यांचा परिणाम काय होणार हे आम्ही पाहणार आहोत. विशेषता या जनगणमध्ये किती सत्यता आहे. या सर्व गोष्टी आम्ही पाहाणार आहोत.”

- Advertisement -

हेही वाचा – अबब… बिहारच्या लोकसंख्येत 25 टक्क्यानी वाढ; जातीनिहाय जनगणनेतून प्रकार उघड

देशात फक्त बिहारने जातनिहाय जनगणना

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “यापूर्वी देखील आम्ही सांगितले की, ओबीसींच्या सर्वेक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. कुठेही नकारात्मक नाहीये. पण बिहारने जी पद्धत अवलंबली तीच वापरायची की दुसरी पद्धत अवलंबलीची का? बिहारी सरकारने जनगणा केली त्याचा काय परिणाम झाला. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, देशामध्ये बिहार व्यतिरिक्त कोणत्याही राज्याने म्हणजे काँग्रेसशासित राज्याने देखील यासंदर्भात अजून कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यासंदर्भातील सगळी माहिती आम्ही घेऊ. मग काय कार्यपद्धती करायची, काय सर्वेक्षण करायचे यासंदर्भात मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -