Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुणे-नगर महामार्गावर दुचाकी पीएमपी बसला धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर दुचाकी पीएमपी बसला धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

पुण्यात खराडी परिसरामध्ये पीएमपी आणि दुचाकिची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात पीएमपी बसने पेट घेतला. बसखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. खराडी बायपासजवळ आज ही घटना घडली.

अजिंक्य येवले असे या तरुणाचे नाव असून तर २६ वर्षांचा होता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-नगर महामार्गावरील खराडी दर्गा येथील बालाजी हॉस्पिटलसमोर आज सकाळच्या सुमारास पीएमपी बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे घर्षण झाले. या घर्षणातून पीएमपीने पेट घेतला. सीएनजीवर चालणारी बस असल्यामुळे बस जळून खाक झाली. बसमधील प्रवासी वेळीच उतरल्याने त्यांच्यापैकी कुणीही जखमी झाले नाही. मात्र बसखाली अडकल्याने दुचाकीस्वार अजिंक्य येवले याचा मृत्यू झाला.


- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: पुणेकरांनो काळजी घ्या! आज कोरोना रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ


 

- Advertisement -