‘Corbevax’ बूस्टर डोसला भारतात मान्यता; कोविशील्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांनाही घेता येणार

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. परंतु, मागील दिवसांत वाढलेले कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. परंतु, मागील दिवसांत वाढलेले कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच भारतात १८ वर्षावरील लोकांना ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉट उपलब्ध करून देण्याला सरकारने मान्यता दिल्याचे समजते. (Biological E Corbevax booster shot for Covaxin and Covishield beneficiaries approved by Government of India)

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर भारतात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या आहेत. सध्या भारतात विविध व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारने ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉटला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत ते कॉर्बेवैक्स बूस्टर डोस घेऊ शकतात अशी माहिती मिळते.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे देशात केंद्र सरकारने लसीकरणावर जोर दिला आहे. केंद्राने राज्य सरकारला पत्र पाठवत कोरोना रुग्णांसाठी बनवण्यात आलेल्या मार्गदर्शिक सूचनांचे पालन करण्यास म्हटले आहे.
दरम्यान, देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस 10 एप्रिलपासून देण्यात येत आहे. दक्षता मात्रा खासगी लसीकरण केंद्रातही उपलब्ध आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. 15 जुलैपासून ही मोहिम देशभरात राबवण्यात येत आहे.

देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोविडच्या केससमध्ये 25.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाची एकूण 44,190,697 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दुसरीकडे, सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची संख्या 128,261 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत देशात 19,539 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 43,535,610 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण 526,826 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 15,21,429 इतके लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 2,07,03,71,204 लसीकरण करण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘…त्याला राजकारणात उद्धव मार्ग म्हणतात’; चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता