नांदेड : मराठवाड्यातील नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. लातूरनंतर नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पशुसंवर्धन विभाग अॅक्शन मोडवर आलं आहे. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सूरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुकुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. (Bird Flu Has Entered In Marathwada Latur And Nanded Hens Affected From Disease)
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्याची 20 पिल्लं मृतावस्थेत आढळली. अचानक मृत्यू झालेल्या या मृत पिल्लांचं पशुसंवर्धन विभागा मार्फत नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मृत पिल्लांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, मृत पिल्लांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किवळा येथील 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुक्कुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विशेष खबरदारी
- बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी किवळा येथील 10 किलो मीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित
- कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्रीची दुकानं, अंडी, कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा, बंद राहणार
- बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये.
- अफवा, गैरसमज पसरविण्यात येऊ नये
- जिल्ह्यात कुठे ही असे आढळल्यास नजीकच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधावा