घरमहाराष्ट्रBJP: भाजपा असेतो वेगळा विदर्भ शक्य नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

BJP: भाजपा असेतो वेगळा विदर्भ शक्य नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Subscribe

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा कधीच नव्हता. आजही ते वेगळा विदर्भ करणार नाहीत.

वाशिम: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर दोन दिवसांच्या वाशिम दौऱ्यावर आहेत. आज , (30 जानेवारी) वाशिम येथे वंचितच्या कार्यालयाचे उद्धाटन करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अंजली आंबेडकर, अरुंधती शिरसाट, किरण गिऱ्हे, डॉक्टर सिद्धार्थ देवळे आदींची उपस्थिती होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा कधीच नव्हता. आजही ते वेगळा विदर्भ करणार नाहीत. (BJP A separate Vidarbha is not possible with BJP Prakash Ambedkar s claim)

विदर्भ वेगळा करणं हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे जर भाजपाला वाटत असेल की वेगळा विदर्भ व्हावा, तर त्यांनी केंद्रात तसा ठराव घ्यावा. मी लहान राज्याच्या बाजूने आहे. लहान राज्यांचा विकास होतो, हे तेलंगणा व इतर राज्यांवरून दिसून येते. लहान राज्यांमध्ये सामान्य माणसाचं उत्पन्न वाढतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

शिंदे, जरांगे आता मराठ्यांचे मोठे नेते

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे यांच्यात जे सामंजस्य झालं, त्यानंतर ओबीसींमध्ये भाजपाविषयी नाराजी पसरली आहे. भाजपाने ओबीसींना फसवलं. त्यामुळे भाजपापासून ओबीसी तुटले आहेत. भाजपाकडून आता जुळवाजुळव सुरू आहे. यामुळे दोन बळी गेले, एक म्हणजे भाजपा आणि दुसरा मराठा समाजातील सरंजाम पुढारी. त्यांनी भूमिका घेतली नाही. ते मागे पडून आजच्या घडीला मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे समाजाचे मोठे नेते म्हणून समोर आले, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मविआ बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार

महाविकास आघाडीची (मविआ) बैठक आज पार पडणार नाही. या बैठकीचं निमंत्रण आम्हाला नाही. मात्र, चर्चेकरता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षांकडून बोलावणे आले आहे. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर व इतर नेते चर्चेसाठी बैठकीला गेलेले आहेत. त्यामुळे काय चर्चा होते, त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करून, असं ही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: World Heritage List : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -