घरमहाराष्ट्रपाणी समस्येच्या तक्रारीवरून भाजप कार्यकर्त्यांची कुटुंबाला मारहाण

पाणी समस्येच्या तक्रारीवरून भाजप कार्यकर्त्यांची कुटुंबाला मारहाण

Subscribe

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यानी एका कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यकर्त्यांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यानी एका कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यकर्त्यांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंब प्रमुख संतोष दोडके यांनी पाणी येत नसल्याची तोंडी तक्रार नगरसेवक कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात केली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुटुंबाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असा घडला मारहाणीचा प्रकार 

याबाबत माहिती समोर येत असून यामध्ये फिर्यादी संतोष लक्षण दोडके (४३) रा. पिंपळे निळख हे गेल्या काही वर्षांपासून पिंपळे निळख येथे राहण्यास आहेत. गुरुवारी दसरा असल्याने कमी दाबाने पाणी आले होते. त्यामुळे फिर्यादी संतोष दोडके हे तुषार कामठे यांच्या जनसंपर्क कार्यलयात सकाळी गेले होते. कार्यलयात बसलेल्या अमोल कामठे याला पाणी येत नसल्याचे तोंडी तक्रार संतोष दोडके यांनी केली. त्यानंतर ते जनसंपर्क कार्यालयातून निघून गेले. रात्री साडेआठच्या सुमारास दोडके कुटुंब हे जेवणासाठी बसले असता तुषार कामठे यांचा ड्रायव्हर गणेश याने संतोष दोडके यांना खाली बोलावून घेतले आणि तुम्ही दरवेळेस पाण्यासाठी कार्यलयात येऊन तक्रार का करता, असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून मुलगा प्राणिकेत आणि पत्नी सारिका इमारतीच्या पार्किंगमध्ये आले, तेव्हा प्राणिकेतने वडील संतोष दोडके यांना वाचण्याचा प्रयत्न केला असता त्याला विशाल कामठे याने लाकडी दांडक्याने छातीत मारले. यात तो जखमी झाला आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, तर संतोष दोडके यांच्या पत्नीला प्रतीक दळवी याने मारहाण केली, असं फिर्यादीत म्हटलं आहे.

- Advertisement -

त्यांची वैक्तिक भांडण आहेत,यात राजकीय विषय नाही.जनसंपर्क कार्यालयात भांडण झाले नाही ते त्यांच्या घरी झाले आहेत.भांडसोबत माझा संबंध नाही,फिर्यादी सचिन दोडके हे काँग्रेस शहराध्यक्षांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळत आहे.
– तुषार कामठे, भाजपा नगरसेवक

पोलिसांचा शोध सुरु 

याप्रकरणी अमोल कामठे, विशाल कामठे, प्रतीक दळवी, गणेश तसेच इतर पाच जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -