घरताज्या घडामोडीदेवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाचे कंत्राट मिळविण्यासाठी सल्लागाराशी संगनमत, भाजपचा आरोप

देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाचे कंत्राट मिळविण्यासाठी सल्लागाराशी संगनमत, भाजपचा आरोप

Subscribe

मुंबई : देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाचे ४०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळविण्यासाठी सल्लागाराने संगनमत करून निविदासंबंधित कागदपत्रांचा पुरवठा केला, असा गंभीर आरोप भाजपचे माजी गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व सल्लागाराने नोटीस मिळूनही खुलासा दिलेला नाही. त्यामुळे सल्लागारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण या नावाखाली मुंबई महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ४०० कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी, भाजपने सदर निविदा प्रक्रिया पाहता अनेक त्रुटींवर बोट ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भाजपच्या विरोधामुळेच पालिकेने सदर निविदा रद्द केली होती, असा दावा प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केला.
या कंत्राटातील सल्लागाराने निविदा निघण्यापूर्वीच संबंधित कंत्राटाची काही कागदपत्रे ह्या निविदेत भाग घेणाऱ्या कंत्राटदारांना पुरविली होती. २ वर्षापूर्वीच सल्लागार व कंत्राटदार ह्यांचे ह्यात संगनमत होते व त्यामधूनच निविदा भरण्यासंदर्भात ही कागदपत्रे दिली गेली होती, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

- Advertisement -

तसेच, देवनार आधुनिकीकरण निविदेतील सल्लागाराला अशाच प्रकारे संगनमत करून निविदा भरण्याच्या प्रकाराबाबत सीसीआय (Competition Commission of India) या यंत्रणेने १.५२ कोटी रुपये कर आकारणी केलेली होती.
मुंबई मनपामध्ये एसबीडी (Standard Bid Document) नुसार दंडात्मक कारवाई झालेल्या कंत्राटदार / सल्लागारास लेखी खुलास देणे आवश्यक असते. परंतु या प्रकरणातील सल्लागार अथवा कंत्राटदार यांनी, अशा प्रकाराचा कोणताही खुलासा आजपर्यंत महापालिकेला सादर केलेला नाही.

मुंबई महापालिकेच्या पारदर्शकतेच्या अनुषंगाने सदर बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने सल्लागाराला कारणे दाखवा नोटीस देण्या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप ह्या प्रकरणी संबंधित सल्लागारावर कठोर कारवाईची मागणी करीत आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपाने बोलताना संयम बाळगावा, आनंद अडसुळांनी बानवकुळेंना खडसावले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -