घरदेश-विदेशBJP: अमित शहा खरे की फडणवीस; पक्ष फुटीवर भाजपा नेत्यांची वेगवेगळी विधाने

BJP: अमित शहा खरे की फडणवीस; पक्ष फुटीवर भाजपा नेत्यांची वेगवेगळी विधाने

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीला भारतीय जनता पक्ष जबाबदार नाही. हे पक्ष भाजपाने फोडले नाहीत. त्यामुळे पक्षफुटीवर दोन्ही नेत्यांची वेगवेगळी विधानं केली आहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात आपण फूट पाडल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो, असं विधान त्यांनी केलं होतं. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नेमकं कोण खरं बोलत आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीला भारतीय जनता पक्ष जबाबदार नाही. हे पक्ष भाजपाने फोडले नाहीत. त्यामुळे पक्षफुटीवर दोन्ही नेत्यांची वेगवेगळी विधानं असल्यानं, नेमकं खरं कोण सांगत आहे, यावर सध्या तरी प्रश्नचिन्हच आहे. (BJP Amit Shah true or Devendra Fadnavis Different statements of BJP leaders on party split)

काय म्हणाले होते फडणवीस?

सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. यशासारखे काहीही यशस्वी होत नाही, असं म्हटलं जातं. मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. आम्ही निवडून आलो. पण आमचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले. हे तर राजकारणात सुरूच असतं. मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन. त्याला अडीच वर्षे लागली. परंतु, अडीच वर्षांनी आलो तर, असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो, असं फडणवीस म्हणाले होते. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

भाजपाने पक्ष फोडले नाहीत- अमित शहा

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपानेच फोडल्याचं म्हटलं जात असतानाच, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, हे दोन्ही पत्र भाजपाने फोडलेले नाहीत. त्यामुळे आता फडणवीस तोंडघशी पडल्याचंच चित्र आहे.

(हेही वाचा: Jitendra Awhad : ही तर जिजाऊंची लेक, रुपाली चाकणकरांना जितेंद्र आव्हाडांनी सुनावले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -