घरमहाराष्ट्रनागपूरमध्ये संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

नागपूरमध्ये संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Subscribe

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. युवक काँग्रेसने मोर्चा काढला होता, हा मोर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर, हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारविरोधात बाईक रॅली काढली होती. ही रॅली संघाच्या मुख्य कार्यालयाजवळून नेण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुरु झाली.

- Advertisement -

संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आणि दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले असं सांगण्यात आलं आहे. खरतर विशेष सुरक्षा व्यवस्था असलेल्या या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात काहीवेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नागपुरातील बडकस चौक आणि आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -