घरताज्या घडामोडीभाजपकडून विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोतांना उमेदवारी, पंकजांना पुन्हा डावललं

भाजपकडून विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोतांना उमेदवारी, पंकजांना पुन्हा डावललं

Subscribe

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या पंकजा मुंडे गेल्या पाच वर्षांमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पंकजा मुंडेंचे समर्थक कितीही नाराज असले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चासुद्धा भाजपमध्ये सुरु आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींनंतर आता विधान परिषदेवरुन राजकीय वातवारण तापलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर भाजपकडून पाठवण्यात येणार आहे. दरम्यान सदाभाऊ खोत यांना संधी दिल्यास विधान परिषद निवडणूक होणार आहे. सदाभाऊ खोत आणि उमा खापरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान भाजपकडून पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलं आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक होणार आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना संधी दिली आहे. दरम्यान सहावा उमेदवार उतरवल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. सहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने सहावा उमेदवार दिला आहे.यानंतर आता विधान परिषदेच्या जागेसाठी सहावी उमेदवार दिला आहे. यामुळे भाजपने दोन्ही निवडणुका चुरशीच्या ठरल्या आहेत. पाचव्या उमेदवारीवर प्रसाद लाड आहेत. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे.

पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले

भाजपकडून विधान परिषदेच्या सहा जागेसाठी उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा होती. परंतु त्यांना पक्षाने डावललं आहे. यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या पंकजा मुंडे गेल्या पाच वर्षांमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पंकजा मुंडेंचे समर्थक कितीही नाराज असले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चासुद्धा भाजपमध्ये सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा : एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होणार, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -