Homeमहाराष्ट्रBJP Appointed Observers : भाजप विधिमंडळ नेता निवडीसाठी निर्मला सीतारमण, रुपाणींची नियुक्ती

BJP Appointed Observers : भाजप विधिमंडळ नेता निवडीसाठी निर्मला सीतारमण, रुपाणींची नियुक्ती

Subscribe

मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला येथील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. त्यासाठीची जय्यत तयारी केली जात आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज आझाद मैदानावरील तयारीचा पाहणी दौरा केला. मंत्रिमंडळातील संभाव्या चेहऱ्यांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोन नेते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडणार आहेत.

निर्मला सीतारमण आणि रुपाणींची नियुक्ती 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. अभूतपूर्व यश महायतीला मिळाले. यानंतर सरकार स्थापनेचा दावा महायुती केव्हा करणार याची उत्सूकता शिगेला पोहचली. मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावरुन महायुतीमध्ये काही दिवस राजकारण रंगले. अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून माघार घेतली. भाजप जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र त्यानंतरही एक आठवडा होऊन गेला मात्र भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होऊ शकला नाही. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीख आणि स्थळ जाहीर केले मात्र भाजपचा विधिमंडळ गटनेता निवड केव्हा हे जाहीर झाले नाही. आज भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडीसाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केव्हा होणार गटनेता निवडीची बैठक?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपचा गटनेता निवडला जाईल. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीसाठी 4 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होईल. या बैठकीचे निमंत्रण भाजपच्या सर्व आमदारांना देण्यात आले आहे. केंद्रीय निरीक्षक सीतारमण आणि रुपाणी यांच्या देखरेखीत पक्षाचा गटनेता निवडला जाईल. सीतारमण आणि रुपाणी हे मंगळवारी रात्री मुंबईत येणार आहेत.

हेही वाचा : Mahayuit Politics : भाजप नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी; शिंदे गटाबद्दल विचारताच बावनकुळे गडबडले

Edited by – Unmesh Khandale