घरताज्या घडामोडीविनोद तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती, तावडे पुन्हा मुख्य प्रवाहात

विनोद तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती, तावडे पुन्हा मुख्य प्रवाहात

Subscribe

भाजप नेते आणि महाराष्ट्रात शिक्षणमंत्री पदासह अनेक जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडणारे विनोद तावडे यांना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांना भाजप प्रभारी म्हणूनही नियुक्त कऱण्यात आले होते. तावडेंनी आपल्या कामाने राष्ट्रीय नेत्यांचीसुद्धा मन जिंकली आहेत. भाजपने विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त केलं आहे. राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपचा पराभव झाला तेव्हापासून विनोद तावडे यांच्याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या चर्चा सुरु होत्या परंतु भाजपने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

भाजप नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त केले आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये देखील विनोद तावडे यांना संधी देण्यात आली होती. त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे देखील नाव कायम ठेवण्यात आले आहे. परंतु आता विनोद तावडे यांना नवी जबाबदारी दिली आहे.

- Advertisement -

भाजप नेते विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे भाजपचे दुसरे नेते आहेत. त्यांच्यापूर्वी या पदावर स्व. प्रमोद महाजन होते. त्यांच्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या पदावर काम पाहिले आहे.

भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे मध्यंतरी भाजपमध्ये दुर्लक्ष झाले होते. मात्र तावडे हे महाराष्ट्रातील भाजपचे जुने आणि संघाच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत तावडेंचे तिकीट कापले होते. तेव्हापासून विनोद तावडे यांच्याकडे दुर्लक्ष आणि ते नाराज झाले असल्याची चर्चा सुरु होती. परंतु भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्यात आले असून त्यांना आता चांगली संधी देण्यात आली आहे. यामुळे विनोद तावडे आता मुख्य प्रवाहात आले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये विनोद तावडे यांना शिक्षणमंत्री पद देण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपली जबाबदारी उत्तम पार पाडली होती. तावडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. भाजपने त्यांना हरियाणामध्ये प्रभारी म्हणूनही नियुक्त केले होते.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी देण्यात आलेल्या नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बिहारच्या ऋतुराज सिन्हा यांना राष्ट्रीय सचिव तर झारखंडच्या आशा लाकडा यांनाही राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केलं आहे. पश्चिम बंगालच्या भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांना राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले आहे.


हेही वाचा : राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -