Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भाजपने निवडणूक लढवली असती तर...; लटकेंच्या विजयावर शेलारांकडून अभिनंदन अन् टीका

भाजपने निवडणूक लढवली असती तर…; लटकेंच्या विजयावर शेलारांकडून अभिनंदन अन् टीका

Subscribe

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. मात्र या विजयानंतर भाजपकडून अभिनंदनासोबत खोचक टीका केली जात आहे. यात भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनीही ऋतुजा लटके यांचे अभिनंदन करत टीकास्त्र डागले आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय..ऋतुजाताईंचे अभिनंदन!! काँग्रेस,राष्ट्रवादी,भाकपडझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली
भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता! असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे शेलारांच्या टीकेला आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके 66,247 मतांनी विजयी झाल्या. तर नोटाला 12 हजार 776 मतं मिळाली. दरम्यान या विजयानंतर ऋतुजा लटके या उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. ऋतुजा लटके यांच्या विजयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेने शिंदेंच्या बंडानंतर मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणल्या आहेत.या पोटनिवडणुकीनंतर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -