घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचे हिंदुविरोधी सरकार मराठी सण साजरा करायला विसरले; शेलारांचा टोला

उद्धव ठाकरेंचे हिंदुविरोधी सरकार मराठी सण साजरा करायला विसरले; शेलारांचा टोला

Subscribe

आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्बंध लादले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली, परंतु आज सरकार बदललं आणि तरुणाईत उत्साह आला, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय असा निशाणाही शेलारांनी लगावला आहे

महाराष्ट्रात मागील महाविकास आघाडी सरकारने हिंदु सण साजरे होणार नाही असे चित्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात होते, देशात कोरोना काळात जगन्नाथ रथयात्रेपासून गंगेकिनाऱ्यांपर्यंत यात्रा, उत्सव साजरे झाले, परंतु उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते, मात्र आता सरकार बदललं असू हिंदू सण मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. मराठी माणसंही सहभागी होत आहेत, असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. भाजपने आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळी येथील जांबुरी मैदानात हंडीचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार यांनी हजेरी लावली.

यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, प्रत्येक विषयावरून निवडणुकीचे राजकारण करता येत नाही. मुंबईकरांचे स्वप्न आपलं मानून भाजप काम करतेय. आज शहरात 370 ठिकाणी भाजपाकडून दहीहंडी उत्सव साजरा करत आहोत. घाटकोपरमध्ये आमदार राम कदम दरवर्षीप्रमाणे इथे दहीहंडी साजरी होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावावर आधारित दहीहंडी आहे, मुंबईकर जनता भाजपसोबत आहे.असंही ते म्हणाले.

- Advertisement -


याशिवाय नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यास विसरली. शिवसेनेच्या डोक्यात केवळ एक कुटुंब सोडून काहीच नाही, मुंबईकरांनी शिवसेनेला सोडलं आहे आणि भाजपला जवळं केले. आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्बंध लादले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली, परंतु आज सरकार बदललं आणि तरुणाईत उत्साह आला, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय असा निशाणाही शेलारांनी लगावला आहे.


निमित्त गोविंदाचे आणि रचले जातात ‘राजकीय कोट्यांचे’ थर…


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -