हारी बाजी को जितना जीसे आता है वो देवेंद्र ही… भाजप नेत्याचे ट्विट चर्चेत

bjp atul bhatkhalkar tweet on maharashtra political crisisi shivsena devendra fadanvis

महाविकास आघाडी सरकार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आले आहे. यामुळे राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. यात आता राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

यात आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी एका प्लॅन तयार केला आहे. यात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील मविआ सरकारविरोधात विधानसभेत फ्लोअर टेस्टसाठी गुरुवारी मुंबईत येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता पडणार हे निश्चित आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही एक सूचक ट्विट केले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीदरम्यान हे ट्विट महत्वपूर्ण ठरत आहे. या ट्विटचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.

हारी बाजी को जितना जीसे आता है, वो देवेंद्र ही दोस्तों कहलाता है… पुन्हा येणार, येणारच… अस ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गट सत्तेत येणार हे निश्चित झाले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीवर पत्र लिहिले, यानंतर राज्यपालांनी आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुमतासाठी आता मविआ सरकारची कसोटी आहे.

दरम्यान 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर 1 जुलै रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविथी होणार आहे. यासाठी आता भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे भातखळकरांच्या ट्विटमधून भाजप सत्तेत येणारचं हे सुचवण्याचा प्रयत्न दिसतोय.


आमदार महेंद्र दळवींचा व्हिडीओ एकनाथ शिंदेंनी केला ट्विट, म्हणाले…