घरताज्या घडामोडीकार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून फलक झळकावण्यास मनाई

कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून फलक झळकावण्यास मनाई

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. परंतु फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचं फलक झळकावू नये, अशा प्रकारचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं आहे. जाहीरात दिल्यास गंभीर भाजपकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे. ज्या लोकांना योगदान द्यायचं आहे. त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावं, असं आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आलं आहे.

भाजपकडून जाहीर आवाहन काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. तसेच वृत्तपत्रातून,टिव्ही माध्यमातून जाहीराती प्रसिद्ध करू नये. जे होर्डिंग, बॅनर आणि जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे. त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन ट्विटच्या माध्यमातून भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या २० जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेवरील याचिका, शिंदे-फडणवीस सरकारची वैधता, विधिमंडळात शिवसेनेचा खरा दावेदार कोण आणि राज्यपालांनी शिंदे सरकारला बहुमत चाचणीची परवानगी देणे, अशा अनेक गोष्टींवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

दरम्यान, २० जुलै रोजी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या वैधतेबाबत सुनावणी होणार असल्यामुळे २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे फलक किंवा उत्सव नको, असं जाहीर आवाहन भाजपकडून करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फडणवीसांसह भाजपमधील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे.


हेही वाचा : राष्ट्रपतीपद निवडणूक : नितीन राऊतांच्या मतदानावर लोणीकरांचा आक्षेप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -