घरताज्या घडामोडीLegislative Council elections: भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

Legislative Council elections: भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

Subscribe

येत्या १० डिसेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून माजी आमदार आणि अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या राजनाथ सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने सिंह यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी उमेदवारांची घोषणा केली. भाजपने धुळे-नंदूरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून माजी मंत्री अमरीश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश  आहे. मुंबई महापालिकेतील संख्याबळ लक्षात घेऊन भाजपने मुंबईतून एकच उमेदवार दिला आहे. सुरुवातीला मुंबईतून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत भाजपचे ८१ सदस्य आहेत. मुंबईत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला ७८ मतांची गरज आहे. त्यामुळे राजहंस सिंह यांना निवडून येण्यात फारशी अडचण नाही.

दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर कोल्हापुरात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपने माजी आमदार अमल महाडीक यांना मैदानात उतरविले आहेत.

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशीम आणि नागपूर या पाच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २३ नोव्हेंबर  २०२१ अशी आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक

कोल्हापूर – अमल महादेवराव महाडीक
धुळेसह नंदुरबार – अमरीश रसिकलाल पटेल
नागपूर – चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे
अकोल, बुलढाणा, वाशिम – वसंत मदनलाल खंडेळवाल
मुंबई – राजहंस धनंजय सिंह

कर्नाटक विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक

कोडागू – सुजा कुशलप्पा
दक्षिण कन्नड – कोटी श्रीनिवास पुजारी
चिकमंगळूर – एम.के. प्रणेश
शिमोगा – डी.एस. अरुण
धारवाड – प्रदीप शेट्टार
बेलगाम – महंतेश कवतगीमठ
गुलबर्गा – बी.जी.पाटील
चित्रादुर्गा – के.एस. नवीन
मैसूर – रघु कौटिल्या
हसन – विश्वनाथ
उत्तर कन्नडा – गणपथी उल्वेकर
बीदर – प्रकाश खांड्रे
मांड्या – मंजू के.आर.पेटे
कोलार – के.एन. वेणुगोपाल
रायचूर – विश्वनाथ. ए. बानाहट्टी
बँगलोर ग्रामीण – बी.एम. नारायणस्वामी
बेल्लारी – वाई.एम. सतीश
तुमकुर – एन. लोकेश
बीजापुर – पी.एच. पुजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -