ईडीची नोटीस पाठवून भाजप काँग्रेसला रोखू शकत नाही, आम्ही लढू आणि जिंकू – बाळासाहेब थोरात

ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते बाळासाहेब थोरात यांनी एक ट्विट केले आहे.

Balasaheb Thorat

ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या पूर्वी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग चार दिवस चौकशी केली होती. यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते बाळासाहेब थोरात यांनी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये काय आहे – 

या ट्विटमध्ये त्यांनी भाजपला त्रास देण्याचा त्यांचा दुष्ट प्रयत्न यशस्वी होणार नाही. केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून सोनियाजी गांधी यांना EDची नोटीस पाठवून भाजप काँग्रेसला सर्वसामान्यांचे प्रश्न घेण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही मागे हटणार नाही, आम्ही लढू आणि जिंकू!, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे मागितली होती मुदत वाढ –

यापूर्वी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी मागितला होता. ज्याची मुद्दत 22 जुलै रोजी संपत आहे.

काय आहे प्रकरण? –

भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते. हे काँग्रेसचे मुखपत्र समजले जायचे. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडले. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या यंग इंडिया या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.