घरमहाराष्ट्रराजकारण आणि शिष्टाचारात ठाकरे, शिंदेंपेक्षा मी ज्येष्ठ!

राजकारण आणि शिष्टाचारात ठाकरे, शिंदेंपेक्षा मी ज्येष्ठ!

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोला आता फिरतेय ती चिल्लर तेव्हा कुठे होती?

आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मीच केला.त्यात शिवसेनेचा काही संबंध नाही.आता जी चिल्लर बाजारात फिरतेय तिचाही काही संबंध नाही.आता लोकार्पण होत असलेल्या चिपी विमानतळाचे कामही मीच केले. परंतु विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेत माझे नाव तिसर्‍या क्रमांकावर टाकण्यात आले. नावाची शाईही फाटली आहे.वास्तविक राजकारणात आणि राजशिष्टाचारात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना ज्येष्ठ आहे, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी लगावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज, शनिवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आमचा वार, वैर नाही. त्यांनी जरूर यावे; पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असेही राणे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

मी १९९० साली पहिल्यांदा आमदार झालो. नंतर मंत्री आणि मुख्यमंत्रीही झालो. सिंधुदुर्गात रस्ते नव्हते, शिक्षणाची सोय नव्हती. रुग्णालयही नव्हते. पाण्याचाही मोठा प्रश्न होता. मुख्यमंत्री असताना मी ११० कोटी खर्च करून तालुक्या-तालुक्यांना जोडणारे २८ पूल आणि डांबरी रस्ते तयार केले. पाण्याचे मोठे प्रकल्प आणले. आता जी चिल्लर बाजारात फिरतेय तेव्हा ती कुठे होती? असा सवालही राणे यांनी शिवसेनेला उद्देशून केला.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून मीच घोषित करायला लावला.त्यादृष्टीने सर्व नियोजन केल्याचेही नारायण राणे म्हणाले. चिपी विमानतळासाठी अगदी सुरुवातीपासूनच मी प्रयत्न केले. यात शिवसेनेचा काहीही संबंध नाही. लोकार्पण कार्यक्रमात मी हेच सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कंत्राटदारांकडून गाड्या घेतल्या
सिंधुदुर्गात विकासकामे सुरू झाली. कंत्राटदारांच्या गाड्या आल्या की लगेच अडवल्या जायच्या. त्यांच्याकडून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःसाठी गाडी घेतली. त्याचे फोटोही माझ्याकडे आहेत. विकासकामात देखील यांनी पैसे खाल्ले, असा आरोपही राणे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -