घरमहाराष्ट्रनीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वत:चे अधिकार वापरतात; पुण्याचे प्रश्न सोडण्यापासून कुणी अडवलंय;...

नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वत:चे अधिकार वापरतात; पुण्याचे प्रश्न सोडण्यापासून कुणी अडवलंय; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Subscribe

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान पुण्याचे प्रश्न न मांडल्याने सत्ताधारी भाजप – शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच पुण्याचे प्रश्न सभागृहात न मांडल्याने ते प्रलंबित राहिल्याचा आरोप भाजपवर केला. तसेच यावरून पुण्याला कुणीवाली राहिला नसल्याचा टोलाही त्यांनी पुण्यातील भाजप आमदारांना लगावला आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. एकतर नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वतःचे अधिक अधिकार वापरतात. ते अधिकार त्यांनी पुण्यासाठी वापरायला अडचण नव्हती. त्यांना त्यांचे अधिकार पुण्यात वापरण्यापासून कुणीचं अडवलं नाही. अशा शब्दात त्यांनी गोऱ्हेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, खरंतर सभापतींनी सर्वांच ऐकायचं असतं. परंतु सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात. सभागृहात सभापतींनी पक्षाचा प्रवक्ता बनायचं नसते, तरी देखील नीलम गोऱ्हे पक्षाच्या प्रवक्ता बनतात. त्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवलं नव्हत, अस म्हणत त्यांच अडीच वर्ष सरकार होतं, थोडथोडकं नाही, त्या काळात त्यांनी पुण्यासाठी काय केलं याची यादी दाखवावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांनी पालमंत्री पदाच्या नियुक्तीतील दिरंगाईवर भाष्य करत म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघे असतानाही निर्णय घेणे थांबले नाही. त्यामुळे पालकमंत्री नसल्याचं मी समर्थन करत नाही, कारण पालकमंत्री नाही म्हणून काही कामं थांबलेली नाही, लवकरचं पालकमंत्र्यांची नेमणूक होईल,

बैलपोळा साजरा केल्याने धुळ्यात दलित कुटुंबावर बहिष्कार घालण्याची घटना घडली, यानंतर राज्यात इतरही ठिकाणी अशा घटना घडत असल्याचं समोर आले. एकूणचं राज्यातील वाढत्या बहिष्काराच्या घटनांबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की ,या घटनांची माहिती घेईन. या प्रत्येक घटनेचा सह्रदयतेने, संवेदनशीलतेने दखल घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे. तसेच सरकार गावोगावच्या अशा घटनांवर लक्ष ठेऊन आहोत. त्या घटनांमध्ये काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे दीर्घ आजाराने निधन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -