घरताज्या घडामोडीभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत करणार प्रवेश? चंद्रकांत पाटील म्हणतात...

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत करणार प्रवेश? चंद्रकांत पाटील म्हणतात…

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आल्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात...

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असून ते पक्षातील नेत्यांवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. त्याच दरम्यान ते अनेकांना जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचे देखील सांगत आहेत. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

कोल्हापुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच पक्षांनी आजवर त्यांना भरभरुन दिले आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल, अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाही, असा मी विश्वास व्यक्त करतो. विशेष म्हणजे याआधीही त्यांच्याबद्दल अशा अनेक चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. त्यामुळे ही देखील अफवाच ठरेल, असा विश्वास मी व्यक्त करतो’.

- Advertisement -

काय म्हणाले जयंत पाटील?

शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला. ‘एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तर जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत चर्चा झाली’, असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. तसेच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाब त्यांच्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे.


हेही वाचा – शरद पवारांना आयकर विभागाच्या नोटीसप्रकरणी निवडणूक आयोगाने हात झटकले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -