घरमहाराष्ट्रहा शिवसेनेच्या दोन गटांतील अतिशय अंतर्गत विषय - चंद्रकांत पाटील

हा शिवसेनेच्या दोन गटांतील अतिशय अंतर्गत विषय – चंद्रकांत पाटील

Subscribe

बंडखोर आमदारांना देण्यात आलेल्या वाय सुरक्षेवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांनी दिलेली केंद्रीय सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी आहे

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हा राजकीय संघर्ष थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. मात्र या राजकीय संघर्षामागे भाजपचा हात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्ह आहेत. परंतु भाजपच्या नेत्यांनी यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. अशात आजही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा शिवसेनचा अतिशय अंतर्गत आणि खाजगी आहे. त्यावर बोलणं बरोबर नाही. भाजपचं नाव घेणाऱ्यांना कोण रोखणार…. हा शिवसेनेच्या दोन गटांतील अतिशय अंतर्गत विषय आहे. भाजपने यात काही करण्याची गरज नाही. असं म्हणत यावर बोलणं पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच एकनाथ शिंदेंसह बंडखोर १५ आमदारांना अपात्र घोषित करण्याबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयावर बोलणेही चंद्रकांत पाटील यांनी टाळले आहे, तसेच हैदराबादमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची पूर्वतयारी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्यातील भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे आणि भाजपच्या नव्या सत्तेची समीकरण तयार केली जात असल्याचा चर्चा सुरु आहेत. मात्र यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, सागर बंगल्यावर कुठल्याही बैठका सुरु नाहीत. भाजपच्या कुठल्याही बैठकीचे सेंटर हे प्रदेश कार्यालय हेड कॉटर असत. लोक भेटायला जातात, बाकी काही नाही.

बंडखोर आमदारांना देण्यात आलेल्या वाय सुरक्षेवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांनी दिलेली केंद्रीय सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी आहे. राज्य जेव्हा सुरक्षा देण्यास कमी होतं तेव्हा केंद्राकडे मागणी केली जाते. ती मागणी केंद्राने मान्य करणं हे सर्व विषयांवर लागू होतं.


उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -