Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अटकेनंतर प्रथमच भाजपाकडून भाष्य; म्हणाले...

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अटकेनंतर प्रथमच भाजपाकडून भाष्य; म्हणाले…

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेश कार्य समिती बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी चंद्रशेखल बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कुरुलकरांच्या अटकेनंतर विरोधकांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले.

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून गोपनीय माहिती दिल्याप्रकरणात डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. कुरुलकर यांच्या अटकेनंतर विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला. शिवाय ‘दुसऱ्यांवर आतापर्यंत देशद्रोह झाला असता, कुरुलकर आहे म्हणून भाजप शांत आहे. एव्हाना दुसरं आतापर्यंत कुणी असतं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असता’, अशा शब्दांत आव्हाडांनीही टीका केली होती. परंतु भाजपाने यावर उत्तर देण्यास टाळले होते. मात्र, आता भाजपाने आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. (bjp chandrashekhar bawankule clear stand on dr pradeep kurulkar rss relation)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेश कार्य समिती बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी चंद्रशेखल बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कुरुलकरांच्या अटकेनंतर विरोधकांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले. “यासंदर्भात चौकशी सुरू आहे. कुटुंबातील किंवा परिवारातील कोणी गुन्हा केला तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. त्यासाठी कुटुंबाला किंवा परिवाराला जबाबदार धरता येणार नाही. गुन्हा करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे. समीर वानखेडे असो की कुरुलकर आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. सध्या चौकशी सुरू असल्याने त्याबाबत बोलता येणार नाही”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

मोबाईलमधील Whatsapp डिलिट

डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा एक मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेला ‘डिकोड’ करता आला नाही. त्यामुळे एटीएसने तो मोबाइल ताब्यात घेतला. त्यानंतर कुरुलकरांना पासवर्ड नमूद करण्यास सांगून अनलॉक केला. त्या मोबाइलमध्ये कुरुलकर यांचे सीमकार्ड टाकले. त्यावेळी या मोबाइलमधील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन डिलीट केल्याचे समजले. त्यामुळे एटीएसने पुन्हा त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप डाउनलोड करत त्यांच्या क्रमाकांचे व्हॉट्सॲप सुरू केले आणि त्याचा बॅकअप घेतला. या व्हॉट्सॲपच्या बॅकअपमधून एटीएसला महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, डॉ. प्रदीप कुरुलकरांना 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मंगळवारी दिले. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कुरुलकर यांना न्यायालयीन कोठडीत कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात येणार असून, त्यांना मधुमेह असल्याने कारागृहात औषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांना घरचे जेवण देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.


हेही वाचा – समीर वानखेडेंना २२ मेपर्यंत अटकेपासून संरक्षण; CBI, NCB ला हायकोर्टाची नोटीस

- Advertisment -