Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रBJP : शिंदेंच्या भूमिकेमुळे महायुती मजबूत; बावनकुळेंनी मानले त्यांचे आभार

BJP : शिंदेंच्या भूमिकेमुळे महायुती मजबूत; बावनकुळेंनी मानले त्यांचे आभार

Subscribe

नागपूर : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा दावा सोडला. याबद्दलची अधिकृत घोषणा स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केली. यावर भाजपनेदेखील आपली भूमिका स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिंदेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूनिकेचे स्वागत केले. “महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. विरोधकांनी शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या.” असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.  (BJP Chandrashekhar Bawankule on shivsena Eknath Shinde role on supporting bjp for cm ship)

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? 

“एकनाथ शिंदेंसारखा कर्तबागर व्यक्ती त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. पण शिंदेंनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्रातील जनतेला तसेच, राज्यातील सर्व जनतेला त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली.” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, मुंबई तसेच महाराष्ट्रात विकासासाठी काम केले. महायुतीचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतली ती खूप मोठी आहे. शिंदेंची भूमिका 14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेसाठी महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. त्यानंतर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रासाठी काम केले. महायुतीला भक्कम करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले,” असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या निर्णयाचे कौतुक केले.

- Advertisement -

“एकनाथ शिंदे कधी रडणारे नाहीत ते लढणारे नेते आहेत. केंद्र नेतृत्त्वाचा त्यांनी कधी अपमान केला नाही. केंद्र नेतृत्त्वाने जे काही सांगितलं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्यांनी कशालाही नाही म्हटलं. महायुती कधीही मुख्यमंत्रिपदासाठी लढत नव्हते. तर आम्ही महाराष्ट्राचा विकासासाठी लढतोय. पण महाविकास आघाडी ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत होती. त्यांनी 8 मुख्यमंत्रिपदाचे चेहरे समोर केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा जनतेने योग्य ती भूमिका घेतली,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय नेतृत्वात अमित शाह मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मोदी आणि शाह हे निर्णय घेतील, त्याला एकनाथ शिंदे आणि शिवसेना पाठिंबा दिला. गुरुवारी 28 नोव्हेंबर केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय घेणार आहेत,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -