आता चित्रा वाघ यांच वादग्रस्त विधान, चंद्रकांत पाटलांची जोतिबा फुलेंशी केली तुलना

bjp chitra wagh compare chandrakant patil with on mahatma jyotiba phule in pune

महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यात राज्यपालांसह भाजप नेत्यांकडून सातत्याने अशी वादग्रस्ते विधानं केली जात आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांची वादग्रस्त विधानांच सत्र काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसतेय. यात आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. चित्रा वाघ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केली आहे. त्यामुळे या विधानावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. घरघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारखा जोतिबांचा शोध आहे. असं विधान त्यांनी केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ यांनी हे विधान केलं आहे. (bjp chitra wagh compare chandrakant patil with on mahatma jyotiba phule in pune)

चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त विधानामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

चित्रा वाघ यांच नेमकं विधान काय?

काही मिनिटांपूर्वी दादा (चंद्रकांत पाटील) खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरुषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळं परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की, पुणे हे स्त्री शक्तीचं केंद्र आहे. पुण्यातूनचं सर्व स्त्री शक्तींच्या चळवळींची सुरुवात झाली आहे. आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे, असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा शुभेच्छा देते, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

यावर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम्ही चित्रा वाघ यांनी खूप प्रगल्भ समजत होतो, मात्र त्या मानसिक संतुलन ढासळल्यासारखं वागत आहेत. आज त्यांनी कमाल केली, चंद्रकांत पाटील यांची तुलना चक्क महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत केली आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना खूश करण्यासाठी असं वक्तव्य करत आहात. अशी वक्तव्ये जरुर करावी, मात्र यात महापुरुषांना घेऊ नका, असा इशारा मिटकरांनी दिली आहे. तसेच तुमचा पक्ष अगोदरचं गोत्यात आला आहे. त्यात तुम्ही आग ओतण्याचे काम करु नका, म्हणत चित्रा वाघ यांना टोलावजा जपून बोलण्याचा सल्लाही दिला आहे.


धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? ठाकरे-शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, निवडणूक आयोगासमोर सुनावणी