शहाजीबापू पाटलांच्या शैलीत भाजपाची संजय राऊतांवर टीका

नाराजीमुळे केलेल्या बंडानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले आहे.

Chitra wagh and sanjay raut

नाराजीमुळे केलेल्या बंडानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र या सरकार स्थापनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहेत. तसेच, वारंवार शिवसेनेच्या नेत्यांकडूनही नव्या सरकारवर टीका केली जात आहे. मात्र शिवसेना नेत्यांच्या या टीकेला भाजपा नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यानुसार, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (bjp chitra wagh slams shivsena sanjay raut in style of mla shahajibapu patil)

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटर अकाऊंटवरून नव्या सरकारवर टीका केली. “रुकने वाला वजह धूंडता हैं… और जाने वाले बहाने… राहत..” असं ट्विट करत त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली. मात्र, त्यांच्या टीकेनंतर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पद्धतीत ट्विट केले.

“काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी… वाट्टोळं एकदम ओके”, असे करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या नव्या सरकार स्थापनेनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते.

मात्र, त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान भाजपाने संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे.


हेही वाचा – प्रवाशांना आरामासाठी मध्य रेल्वेची सीएसएमटी स्थानकात ‘ही’ खास सविधा