घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबादसह मराठवाड्यातील चार जागांवर भाजपाचे लक्ष; भागवत कराडांची माहिती

औरंगाबादसह मराठवाड्यातील चार जागांवर भाजपाचे लक्ष; भागवत कराडांची माहिती

Subscribe

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता जे. पी. नड्डा यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे. तसेच, यावेळी भाजपा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता जे. पी. नड्डा यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे. तसेच, यावेळी भाजपा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी माध्यमांशी संवाद साधताना औरंगाबादसह मराठवाड्यातील चार जागांवर भाजपाचे लक्ष असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे संबंधित चार जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. (BJP claim on Shiv Sena 4 LokSabha seats says Union Minister Bhagwat Karad)

भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी पक्षाचा कार्यकर्ता असून, पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे”. दरम्यान, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चारही जागांवर भाजपाने दावा केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेतील बंडखोरीनंतर काही आमदार ठाकरेंसोबत आहेत तर काही आमदार अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. अशातच परभणीचे खासदार बंडू जाधव आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे, या दोन्ही जागांवर भाजपाने निवडणुकीसाठी दावा केला आहे. तर, औरंगाबाद येथील जागेवर सध्या एमआयएमचे खासदार आहेत. त्यामुळे, या तीन आणि हिंगोलीच्या जागांवर सध्या भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यातच, महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं लोकसभा सदस्य असलेलं राज्य आहे. त्यामुळे, भाजपचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८ जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे.

- Advertisement -

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे वरिष्ठ नेते हजर असणार आहेत.


हेही वाचा – केसरकरांचे आत्मपरीक्षण म्हणजे त्यांच्याच गटात मतभेद; संजय राऊतांचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -