Homeमहाराष्ट्रMaharashtra BJP Meeting : भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच, देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री

Maharashtra BJP Meeting : भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच, देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री

Subscribe

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीत विधीमंडळ गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पंजाबचे प्रभारी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण हे दोन्ही नेते या कोअर कमिठीच्या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्या

मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीत विधीमंडळ गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पंजाबचे प्रभारी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण हे दोन्ही नेते या कोअर कमिठीच्या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यामुळे बुधवारी (ता. 04 डिसेंबर) रोजी सकाळी ही बैठक पार पडली आणि त्यात फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या आमदारांची विधीमंडळ गटनेता निवडीची बैठक घेण्यात झाली. यावेळी गटनेतेपदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून मांडण्यात आला. तर आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, मेघना बोर्डीकर, पंकजा मुंडे, योगेश सागर, संजय कुटे, प्रवीण दरेकर, रणधीर सावरकर व अन्य काही आमदारांनी या प्रस्तावावर अनुमोदन देत पाठिंबा असल्याचे सांगितले. ज्यानंतर एकमताने देवेंद्र फडणवीसा यांच्या नावावर शिक्का लगावत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. ज्यामुळे आता गुरुवारी, 05 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही निश्चित झाले आहे. (BJP Core Committee Meeting Devendra Fadnavis name has been confirmed as BJP group leader)

बुधवारी सकाळी पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत केले. याशिवाय भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, मनिषा चौधरी, प्रविण दरेकर, पराग अळवणी, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, अतुल सावे, शिवेंद्रराजे भोसले, राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.

हेही वाचा… Mahayuti News : महायुती राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार, एकनाथ शिंदे अन् अजितदादा उपस्थित राहणार का?


Edited By Poonam Khadtale