Narayan Rane : राणेंच्या निवासस्थानासमोर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी, काँग्रेसचे ५० कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

mumbai bmc issues notice narayan rane for juhu bungalow will be inspected

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानापासून १०० मीटर अंतरावरच पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामुळे कणकवलीत वातावरण तापले होते. भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सुबुद्धी द्यावी आशा आशयाचे गाऱ्हाणे घातले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवस्थाना समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते राणेंच्या बंगल्या बाहेर एकवटले होते. हिंमत असेल तर बंगल्यावर येऊन दाखवा असे प्रतिआव्हान भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे यांनीं दिले आहे.

काँग्रेस ने आंदोलन करण्याचा इशारा देऊन नाहक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला हा खासगी आहे शासकीय नाही. त्यामुळे येथे आंदोलन करता येणार नाही.उगाच आम्हाला आव्हाने देऊ नका असा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना राणे यांच्या निवासस्थानापासून शंभर मीटर अंतरावर रोखले.


हेही वाचा : Fodder Scam Case: चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय