Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजप नगरसेवकाची महिला अधिकाऱ्याशी उर्मटपणे वागणूक, रुपाली चाकणकरांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

भाजप नगरसेवकाची महिला अधिकाऱ्याशी उर्मटपणे वागणूक, रुपाली चाकणकरांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

भाजप नगरसेवकांच्या बेजबाबदार वर्तणूकीने पुणेकरांची मान शरमेने खाली गेली

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुण्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनाविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना योद्ध्यांच्या रुपात लढा देत आहे. या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आहोरात्र काम रत आहेत. पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी महिला अधिकाऱ्याशी उर्मटपणे वागून त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार केला आहे. याविरोधात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या महिला अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकर एक आचारसंहिता आणि नियमावली तयार करण्याचे निवेदन दिले आहे.

देशासह सर्वच राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे कोरोना लसीकरण मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी माझ्या प्रभागामध्ये लस केंद्र कधी चालू करणाक असे म्हणत एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याशी उर्मटपणे वागणूक केली आहे. तसेच त्याच्या अंगावरही धावून गेले आहेत. याबद्दल रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, भाजप नगरसेवकांच्या बेजबाबदार वर्तणूकीने पुणेकरांची मान शरमेने खाली गेली आहे. जवळपास १०० नगरसेवक असणाऱ्या पुणे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. परंतु यांची नियत मात्र १०० कौरवांसारखी आहे. कारण यांच्या टोळीतील एक नगरसेवक धनराज घोगरे हे ‘माझ्या प्रभागामध्ये लस केंद्र कधी चालू करणार’ म्हणून एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याशी उर्मटपणे वागून त्यांच्या अंगावर धावून जातात हे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या या अशा महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकर एक आचारसंहिता आणि नियमावली तयार करून त्यांना योग्य ते संरक्षण पुरवावे याबतीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज पोलीस आयुक्तांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -