घरमहाराष्ट्र“लोका सांगे ब्रह्मज्ञान…”, भाजपची राष्ट्रवादीला कोपरखळी

“लोका सांगे ब्रह्मज्ञान…”, भाजपची राष्ट्रवादीला कोपरखळी

Subscribe

भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीला टोला हाणला आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी गुरुवारी नागपूर न्यायालयात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर झाले होते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने फडणविसांवर टीकेची झोड उठवली होती.. राष्ट्रवादीच्या या टीकेला भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र भाजपने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हे व्यंगचित्र ट्वीट केले आहे. या व्यंगचित्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हातात एक फाईल आहे. त्यावर जनतेसाठी आंदोलन करतानाचा खटला, असं लिहिलेले आहे. ही फाईल घेऊन फडणवीस कोर्टात जाताना दाखवले आहेत. फडणवीसांच्या मागे शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड दाखवलेले आहेत. “लपवाछपवी करू नका!” असे फडणवीसांना उद्देशून म्हणताना त्यांना दाखवले आहे. परंतू हे दाखवताना त्यांच्या मागे एक कपाट आहे. त्यात घोटाळ्यांच्या फायली बाहेर येताना दिसत आहेत. त्यात सिंचन घोटाळा, लवासा घोटाळा, राज्य सहकारी बँग घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, अशा फायलींचा यामध्ये समावेश आहे. यावर “लोका सांगे ब्रह्मज्ञान…” अशी कोपरखळी देखील भाजपने राष्ट्रवादीला लगावली. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

गुरुवारी नागपूर न्यायालयाने फडणवीसांना १५ हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

साधारण १९९५ ते १९९८ च्या दरम्यान आम्ही जनतेसाठी आंदोलन केले होते. त्याबाबत आमच्यावर केस दाखल झाली होती. त्यानंतर दोन खासगी तक्रार माझ्याविरोधात होत्या. त्या संपल्या आहेत. मात्र, मी हे दोन्ही गुन्हे लपवल्याविरोधात माझ्यावर आरोप करण्यात आले. ही केस मी सत्र न्यायालयात जिंकलो, उच्च न्यायालयात जिंकलो, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सत्र न्यायालयात हा खटला पाठवला. मला विश्वास आहे, की निवडणूक निकालावर परिणाम करणारे हे गुन्हे नाहीत. माझ्यावर जे गुन्हे होते ते आंदोलनाचे होते, माझ्यावरील सर्व केसेस या लोकांसाठी केलेल्या आंदोलनाच्या आहेत, अन्य कोणत्याही नाहीत. सर्व गोष्टी आम्ही न्यायालयासमोर ठेवू, आम्हाला न्याय मिळेल. मला न्यायपालिकेवर विश्वास आहे. यामागे कोण आहे याची मला पूर्ण माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय आहे?

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटले लपवल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांनी केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी जेएमएफसी न्यायालयात केली होती. अॅड. सतीश उके यांची याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -