Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'लोका सांगे ब्रह्म ज्ञान...'; मंत्र्यांच्या सभांचे फोटो शेअर करत भाजपचा ठाकरे सरकारवर...

‘लोका सांगे ब्रह्म ज्ञान…’; मंत्र्यांच्या सभांचे फोटो शेअर करत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत जनतेला संबोधित केलं. सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. भाजपने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभांचे फोटो शेअर करत ‘लोका सांगे ब्रह्म ज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ या म्हणचा उत्तम प्रत्यय उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरुन येतोय, असा टोला भाजपने लगावला आहे.

भाजपने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदग्रहण सोहळ्याचा फोटो शेअर केला आहे. “काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले यांनी स्वीकारली तेव्हाचा हा कार्यक्रम. स्टेजवर व स्टेजसमोरही उसळलेली ही गर्दी. ना कुणाच्या चेहऱ्याला मास्क होते ना सोशल डिस्टन्सिंग! गर्दीला चेहरा नसतो म्हणतात. पण आजच्या जगात अशा गर्दीला कोरोनाचा चेहरा मानला जातो,” असं ट्विट भाजपने केलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या देखील कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. “हा बघा जितेंद्र आव्हाड यांचा कार्यक्रम. ते आपल्या राज्याचे सन्माननीय गृहनिर्माणमंत्री आहेत. अशा कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे त्यांना कोण समजावणार?,” असं ट्विट भाजपने केलं आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मेळाव्याचा देखील फोटो भाजपने शेअर केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा हा मेळावा. त्यांच्या या मेळाव्यात सोशल डिस्टंसिंगची पार फज्जा उडाला आहे. मुख्यमंत्र्यांना या मेळाव्याला कोरोनाच्या नियमावलीची आठवण आली नाही का?,” असं ट्विट करत भाजपने सवाल केला आहे.

- Advertisement -

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे फोटो भाजपने शेअर केले आहेत. “ठाकरे सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचा हा सोहळा. हा सोहळा बघितल्यावर एकच ओळ आठवते, लोका सांगे ब्रह्म ज्ञान… बहुतेक उद्धव ठाकरे यांना या वाढदिवसाच्या सोहळ्याचं आमंत्रण नसावं,” असा उपहासात्मक टोला देखील भाजपने लगावला आहे.


हेही वाचा – भयंकर! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात घरोघरी कोरोनाचे रुग्ण


 

- Advertisement -