घरताज्या घडामोडीकेवळ संधीसाधूपणा, स्वत:ला मनमोहन सिंग समजतात; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांवर भाजपची टीका

केवळ संधीसाधूपणा, स्वत:ला मनमोहन सिंग समजतात; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांवर भाजपची टीका

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सहभाग घेतला होता. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. ही यात्रा सध्या राजस्थानमध्ये असून भदोईमध्ये राहुल गांधींसोबत राजन चालत असल्याचे फोटो काँग्रेसने ट्वीट केल्यानंतर भाजपाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. केवळ संधीसाधूपणा असून स्वत:ला हे मनमोहन सिंग समजतात, अशी टीका भाजपने रघुराम राजन यांच्यावर केली आहे.

रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेला लावलेल्या हजेरीवरुन भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. रघुराम राजन यांना काँग्रेसने नियुक्त केलं आहे. त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला याचं काही आश्चर्य वाटलं नाही. ते स्वत:ला पुढील मनमोहन सिंग म्हणून पाहतात, असं अमित मालविया म्हणाले.

- Advertisement -

भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांनी केलेलं भाष्य हे दुसऱ्याकडे तिरस्काराने बघण्याची पद्धत असं म्हणत झिडकारलं पाहिजे. त्यांच्या टीकेला एक विशिष्ट विचारसरणीचा रंग आहे. तसेच हा केवळ संधीसाधूपणा आहे, असंही मालविया म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन मंगळवारी शेअर करण्यात आला. नफरत के खिलाफ देश जोड़ने के लिए खड़े होने वालों की बढ़ती संख्या बताती है कि- हम होंगे कामयाब, असं हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.


हेही वाचा : ट्विटरमुळे पेटला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा वणवा, ‘त्या’ फेक ट्वीटचा घोळ काय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -