घरताज्या घडामोडीडीजे बंद केल्याने जमावाचा पोलीस स्टेशनवरच हल्ला, कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याची भाजपकडून...

डीजे बंद केल्याने जमावाचा पोलीस स्टेशनवरच हल्ला, कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याची भाजपकडून टीका

Subscribe

फर्निचर आणि ऑफिसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. ऑफिसचे नुकसान केल्यानंतर जमावाने त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

डीजे बंद केल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवरच हल्ला केला. हल्ल्यात पोलीस स्टेशनची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ८ ते १० समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करुन डीजे लावण्यात आला होता. रात्री पोलिसांनी डीजे बंद केल्यामुळे जमाव संतप्त झाला. या घटनेवरुन विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याची टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. पोलिसांना कोणी वाली उरला नाही असे भातखळकर म्हणाले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सामाजिक अंतर आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांना मध्यरात्रीपर्यंत वाढदिवसानिमित्त पार्टी सुरु होती. शेगाव पोलिसांना रात्री १ च्या सुमारास वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार मिळाली होती. यानुसार पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन डीजे बंद केला. डीजे बंद केल्याच्या रागात ३० जणांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला.

- Advertisement -

पोलीस स्टेशनमधील सामनाची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पोलीस स्टेशनचे मोठे नुकसान झालं आहे. टेबल खुर्च्या, खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. फर्निचर आणि ऑफिसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. ऑफिसचे नुकसान केल्यानंतर जमावाने त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या – भातखळकर

बुलढाणा जिल्ह्यातील घटनेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे वाढदिवसादरम्यान डीजेला मज्जाव केल्याने पोलीस स्टेशनवर ८ ते १० समाज कंटकांनी हल्ला केला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पोलिसांनाही वाली उरलेला नाही. अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद रद्द, मात्र लवकरच रोखठोक बोलणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -