Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र भाजपने फेडलं स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज

भाजपने फेडलं स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज

Related Story

- Advertisement -

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. लोणकरच्या आत्महत्येनंतर नियुक्त्यांबाबत प्रकरण उजेडात आलं. आत्महत्येवरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपल्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे म्हटलं होतं. त्यावर आता भाजपने स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची परतफेड केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भाजपने कर्जफेड केली आहे.

स्वप्नील लोणकरचे वडील सुनील लोणकर यांच्यावर १९ लाख ९६ हजार ९६५ रुपयांचं कर्ज होतं. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचं कर्जाची परतफेड आज भाजपकडून करण्यात आली. मुलाची आत्महत्या, त्यात घरातील प्रिंटिंग प्रेस बंद आणि कर्जफेडीसाठी पतसंस्थेनं लावलेला तगादा यामुळे स्वप्नीलचं कुटुंब त्रस्त झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नामुळे भाजपकडून स्वप्नीलच्या कुटुंबाचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते धनादेश लोणकर कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

- Advertisement -

राज्य सरकार असंवेदनशील- फडणवीस

कर्ज डोक्यावर असताना लोणकर यांचा हातचा मुलगा गेला. त्यांचं कर्ज फेडण्याचा निर्णय भाजपनं घेतला. त्यासाठी प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला. खरं तर सरकारनं तत्त्काळ मदत करणं अपेक्षित होतं. एवढी मोठी घटना घडली. सभागृहातही याबाबत चर्चा झाली. पण सरकार संवेदनशील नाही, याचं वाईट वाटतं. ही पतसंस्था ज्या पक्षाची आहे त्यात मला जायचं नाही. पण सरकारकडून मदत करणं शक्य होतं ते झालं नाही. थोडंफार कर्ज माफ करता आलं असतं तर लोणकरांना जास्त मदत करता आली असती, असं मत यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलं.

दरेकरांनी शब्द पाळला

- Advertisement -

यापूर्वी घरी जाऊन स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची १४ जुलै रोजी भेट घेतली होती. त्यावेळी मी शब्द दिला होता की भाजप नक्की मदत करेल. आज स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोणकर कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. याचा मीही साक्षीदार ठरलो. एकीकडे ‘शब्दाला जागणारी’ भाजप आणि दुसरीकडे ‘शब्द फिरवणारे’ महाविकास आघाडी सरकार, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

 

- Advertisement -