Homeमहाराष्ट्रBest Bus Acident : भाडे तत्वावरील बसगाड्यांबाबत पुनर्विचार करा; भाजपाची बेस्टकडे मागणी

Best Bus Acident : भाडे तत्वावरील बसगाड्यांबाबत पुनर्विचार करा; भाजपाची बेस्टकडे मागणी

Subscribe

कुर्ला येथील भीषण बेस्ट बस अपघाताप्रकरणी केवळ बस चालकाचीच नव्हे, तर कंत्राटदारचीही सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडे मंगळवारी केली.

मुंबई : कुर्ला येथील भीषण बेस्ट बस अपघाताप्रकरणी केवळ बस चालकाचीच नव्हे, तर कंत्राटदारचीही सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडे मंगळवारी केली. (BJP demands BEST to reconsider fare-based buses)

बेस्ट उपक्रमात भाडे तत्वावर बस घेण्याची पद्धत शिवसेना (उबाठा) सत्तेवर असताना 2018 पासून सुरुवात झाली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार भाडे तत्वावरील बस गाड्या घेण्यात आल्या आहेत. वास्तविक, भाडे तत्वावरील बसगाड्यांवर बस चालक म्हणून अनुभव नसलेल्या लोकांना कमी वेतानात कामावर ठेवले जाते. त्यांना मुंबईतील रस्त्यांची माहिती नसते. गर्दीत, मार्केट परिसरात बसगाडी नीटपणे चालवणे त्यांना जमत नाही. त्यामुळेच बस अपघात होतात. गेल्या वर्षभरात मुंबईत बेस्ट बसमुळे आठ अपघात झाले आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाडे तत्वावरील बसगाड्या आणि कंत्राटी बस चालक यांबाबत पुनर्विचार करावा, असे भाजपाकडून सुचविण्यात आले आहे.

हेही वाचा – Kurla Bus Accident : कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे…; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

कुर्ला येथील बेस्ट बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे बेस्ट प्रशासनाला आणि जनप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणार आहे. सध्या बेस्ट ताफ्यातील 3 हजार बेस्ट बसेसपैकी 2 हजार बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर चालविण्यात येतात. बेस्ट उपक्रमाने, कुर्ला येथील बेस्ट बस अपघाताची सखोल चौकशी करून सदर घटनेसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ एका वाहन चालकावर कारवाई करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही असा इशारा आम्ही आपणास देता आहोत, असे भाजपकडून पत्राद्वारे बेस्टला कळविण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख मदत द्या

दरम्यान, सदर बेस्ट अपघातात बेस्ट चालक आणि कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत, अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना बेस्टने तातडीने 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा. तसेच, जखमी नागरिकांना 50 हजार रुपये ते दोन लाख रुपये पर्यंत मदत म्हणून तातडीने देण्यात यावी, अशी मागणी भाजपाने सदर पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा – EVM Tamper : आयोग आणि ईव्हीएम विरोधात पराभूत उमेदवारांची सर्वोच्च न्यायालयात धाव


Edited By Rohit Patil