घरक्राइमभाजपवाल्यांनी संसार उद्ध्वस्त केला; व्हिडीओ तयार करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

भाजपवाल्यांनी संसार उद्ध्वस्त केला; व्हिडीओ तयार करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

 

सांगोलाः माझा संसार होता. भाजपवाल्यांमुळे माझा संसार उद्धवस्त झाला, असा व्हिडीओ तयार एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषारी वनस्पतीच्या बिया खाऊन पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मी धोत्र्याच्या बिया खाल्ल्या आहेत, असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. तिला तत्काळ उपचारासाठी सांगोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले.

- Advertisement -

सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासोबतचा या पीडित महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला. श्रीकांत देशमुख मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे, असं पीडित महिला व्हिडीओमध्ये बोलत आहे. माझ्या मृत्यूला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख, त्यांचे दोन्ही भाऊ हे जबाबदार असतील. माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे. हे आता मला असह्य झाले आहे. माझी आता जगण्याची लायकी नाही. माझ्याजागी दुसरी मुलगी असती तर तिनेही हेच केलं असंत. मी अनेकांकडे मदत मागितली. कोणी मदत केली नाही. कोणी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे, असा धक्कादायक दावा पीडित महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे.

शालू, मगंळसुत्र, असा साज करत महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. युवा मोर्चामधील गणेश पांडे, दिवेकर, अमित शेलार, नील सोमय्या, दीपक ठाकूर, संतोष आव्हाड आणि इतर लोकांना माहिती आहे की मी कशी आहे . आशिष शेलार आणि दिव्या ढोले यांनाही मी कशी आहे, ते माहिती आहे. माझा संसार होता. भाजपवाल्यांमुळे माझा संसार उद्धवस्त झाला. हे भाजपवाल्यांना कळावं म्हणून मी आत्महत्या करत आहे, असेही पीडित महिलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांची बदनामी करते असा आरोप करत पीडित महिलेविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने थेट श्रीकांत देशमुख यांचे जवळातील घर गाठले. त्यानंतर पीडित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -