घरमहाराष्ट्र'शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील नाहीतर...' पवारांच्या वाईन विक्रीच्या वक्तव्यावर फडणवीसांची...

‘शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील नाहीतर…’ पवारांच्या वाईन विक्रीच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी बजेट अगदी सोप्प्या भाषेत सांगितला आहे. जे लोकं बजेट न वाचता टीका करत होते त्या टीकाकारांना उत्तर मिळाले.

राज्य सरकारने राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ही परवानगी देण्यात आली. मात्र या निर्णयाविरोधात आता विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. यातच आज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीबाबतचा निर्णयावरुन वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर वावगं ठरणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत. मात्र पवारांच्या या वक्तव्यावरून आता सरकार वाईन विक्रीचा निर्णय मागे घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एकप्रकारे सरकारला हा सल्लाच दिला आहे की, सुधरा. शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील नाहीतर आम्ही जनतेमध्ये जातच आहोत” असं म्हणत पवारांच्या वाईन विक्रीच्या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे,.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “वाईन विक्रीच्या निर्णयामुळे सरकारीची अब्रु चालली आहे. हे जे काही डिलिंग करुन सरकारने निर्णय घेतला तो काही मुठभर लोकांच्या फायद्याकरिता घेतला आहे. यामुळे हे सरकार उघडं पडलं आहे. त्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल हे शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एकप्रकारे सरकारला हा सल्लाच दिला आहे की सुधरा.”

- Advertisement -

“शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील. नाहीतर आम्ही तर जनतेमध्ये जातचं आहोत. सर्वचं स्तरातून याला प्रचंड विरोध आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही हा भाजपचा संकल्प आहे.” असं इशारा फडणवीसांनी दिला आहे.

“बजेट न वाचता टीका करणाऱ्यांना एकप्रकारे उत्तर”

दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी बजेट अगदी सोप्प्या भाषेत सांगितला आहे. जे लोकं बजेट न वाचता टीका करत होते त्या टीकाकारांना उत्तर मिळाले आहे की, सामान्य माणसाकरिता लाखो रुपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे आणि देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत झाली आहे. २०१३-१४ मध्ये भारताचा जो जीडीपी होता तो जीडीपी जवळपास दुप्पट भारत करु शकला. असं फडणवीस म्हणाले.


Wine : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी, शरद पवार म्हणतात विरोध फार चिंतेचा….

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -