भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

आमच्या काळात सुरु झालेले सर्व प्रकल्प थांबवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान महाविकास आघाडीमुळे सुरु आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला, पण त्याबद्दल एक शब्द काढण्यास हे सरकार तयार नाही'', अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

bjp devendra fadanvis slams shiv sena and sanjay raut maha vikas aghadi govt on rajya sabha election 2022

“भाजप निवडून आल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडले, काही लोकं तर बावचळले तर काही पिसाटलेत”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली.

“आपण जिंकले आहोत. जिंकलेल्यानी नम्रता न सोडता आनंद करायचा असतो, उन्माद करायचा नसो, त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करुया. काही लोकं सांगतायत की, कोणामुळे हे जिंकले? त्यांना जर खरचं माहिती असेल तरी ते काहीच करू शकणार नाहीत. याचं कारण त्यांच सरकार त्यांना टिकवणं महत्वाच आहे. म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली, त्यांच्यावर हे जर कारवाई करायला निघाले तर ते निघूनच जातील, पण जे ह्यांच्या दबावाखाली मदत करु शकले नाही, पण मनाने आपल्यासोबत राहिले तेही निघून जातील. असा दावा देखील फडणवीसांनी केला आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज”

“राज्यसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आम्ही जिंकलो ते हरले इथपर्यंत हा विषय मर्यादित नाही. पण महाराष्ट्र थांबलाय, महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. या सर्व अंतरविरोधाच्या अंतर्गत केवळ आमचं लढायचं म्हणून आमच्या काळात सुरु झालेले सर्व प्रकल्प थांबवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान महाविकास आघाडीमुळे सुरु आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला, पण त्याबद्दल एक शब्द काढण्यास हे सरकार तयार नाही”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. मात्र, हे सरकार काहीही करत नाही. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारख वागल पाहिजे. पण सुद्दैवाने मुंबईत माझे घर नाही. असते तर मलाही नोटीस आली असती. नागपुरातील माझे घर नियमानुसार बांधले आहे, असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस मारला आहे.

“आता विधान परिषदेची जागा लढवणार”

“विधान परिषदेची जागा आपण लढवणार आहोत. ही निवडणूक सोप्पी असेल म्हणणार नाही पण जे चित्र दिसतेय अंतरविरोध दिसतोय…. जसं इथे सद्सदविवेक बुद्धीला स्मरूण आपल्याला मतदान करुन जिंकवलं तिथे तर सिक्रेट बॅलेट असल्यामुळे जास्ती लोकांची सद्सदविवेक बुद्धी जागरुक असेल असा दावा त्यांनी केला आहे.


अपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी प्रवृत्ती, काहींची क्षणिक छोट्यामोठ्या कामांबाबत नाराजी – प्रफुल्ल पटेल