शरद पवारांवर 48 तासात बेळगावला जाण्याची वेळ येणार नाही; फडणवीसांचे आश्वासन

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आहे. अशा परिस्थित राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी 24 तासांत कर्नाटकचे हल्ले थांबले नाहीत तर बेळगावला जाणार असल्याचा धमकी वजा इशाराच दिला आहे. पवारांच्या या इशाऱ्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 48 तासात शरद पवार यांना कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नाही, कर्नाटक सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल, पण अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर हे प्रकरण वाढत जाईल, ज्या कोणाच्या हिताच्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात अशा घटना घडणार यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे प्रकरण गृहमंत्री अमित शाह

फडणवीस म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलून नाराजी, चिंता व्यक्त केली. तात्काळ यावर कारवाई केली पाहिजे. अशी अपेक्षाही व्यक्त केली, यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, याप्रकरणी तात्काळ कारवाई केली जाईल, आणि जे लोकं अशाप्रकारच्या घटना करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बोम्मई यांनी असेही आश्वासन दिले की, सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. त्यामुळे बोम्मई यांनी जे सांगितले त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. त्यासोबत पूर्ण विषय मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. कारण आपल्याला विकासाकडे जायचे आहे, अशाप्रकारे राज्या-राज्यांमध्ये हे जर वातावरण होऊ लागलं तर ते योग्य नाही असही फडणवीस म्हणाले.

आपल्या संविधानाने कोणालाही कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार दिला आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे, राहण्याचा अधिकार दिला आहे, कोणीही थांबवू शकत नाही, त्यामुळे जर एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्याने ते रोखण्याचे काम केले पाहिजे. पण राज्य सरकार रोखत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते केंद्रापर्यंत घेऊन जावे लागेल. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ते घडतय की नाही आम्ही पाहतोय. त्यासोबत त्याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहे असे आश्वासनही फडणवीसांनी दिले आहे.

एखाद्या अॅक्शनला रिअॅक्शन येते पण महाराष्ट्र हे न्याय उचित आणि न्यायपूर्ण अशाप्रकारचं राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्रात असं कोणी करु नये असं माझं आवाहन आहे. महाराष्ट्र देशात न्यायप्रियतेसाठी ओळखला जातो, अन्य राज्यांपेक्षा आमचं वेगळंपण हे आहे की, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नेहमीच राहिलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात अशा घटना कोणीही करू नयेत आणि कोणी करत असतील तर त्याला पोलीस रोखतील असही फडणवीस म्हणाले.

मुळात या सगळ्या गोष्टीची सुरुवात मुख्यमंत्री शिंदे यांच्या चर्चेमुळे झाली, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना चर्चेला बोलवलं होते. यावेळी शरद पवारांनाही बोलवलं पण ते तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकले नसतील. सीमा प्रश्नात त्यांनी चांगलचं लक्ष घातलं आहे. विविध पक्षांच्या लोकांना आणि सीमा भागातील लोकांना बोलवून पुढे काय करायचं यावर चर्चा झाली. अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु असताना चिथावणीखोर वक्तव्य करत तिथली परिस्थिती बिघडवणे हे योग्य नाही, कायदेशीर नाही आणि दोन्ही राज्यांच्या हिताचे नाही. अस आवाहनही फडणवीस यांनी केले.