राज्यसभा निवडणुकीच्या उशिराने मतमोजणीला मविआ सरकार जबाबदार -देवेंद्र फडणवीस

सरकारच्या आमदारामध्ये अस्वस्थता आहे. कारण ज्यावेळी सरकारचं काम थांबलेलं असत आणि काहीच काम होत नाही तेव्हा तो राग आमदारांना फेस करावा लागतो'', असही फडणवीस म्हणाले

bjp Devendra Fadnavis slams mahavikas aghadi govt on Rajya Sabha election 2022

“राज्यसभा निवडणुकीदरम्यान काल दिवसभर काही लोकं सातत्याने मीडियावर बोलत होते, ट्विट करत होते. एकाप्रकारे दुराभीमान आणि गर्व याचा दर्प… सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा माणसाचा व्यवहार कसा होतो याचं चित्र काल सातत्याने पाहायला मिळत होतं. मला आश्चर्य वाटतं त्यांनी नियमाप्रमाणे आम्ही तक्रार केली त्यांनी तक्रार केली. उशीर त्यांच्या तक्रारीनंतर झाला. आमची तक्रारी निकाली निघाल्यानंतर त्यांची तक्रार गेल्याने पुन्हा दोन अडीच तास कमिशनला काम करावे लागले, असं असताना मविआच्या नेत्यांनी पुन्हा जुनी टेप चालू केली, रेकॉर्ड कोणाचं बदलत नाही. महाराष्ट्राला वेठीस धरू नका, महाराष्ट्राला वेठीस धरू नका… अरे तुम्ही थोडी महाराष्ट्र आहे… तुम्ही उमेदवार आहे. तुम्ही चुक केली.. संविधानाने आम्हाला अधिकार दिला. आम्ही तक्रार केली तर महाराष्ट्राला वेठीस धरन आणि ह्यांनी तक्रार केली तर स्वागतार्ह.. ” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी उशीराने झालेल्या मतमोजणीला महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या विजय जल्लोषानंतर मुंबईतील पक्ष कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले. (bjp Devendra Fadnavis slams mahavikas aghadi govt on Rajya Sabha election 2022)

“…यामुळेचं आमचा तिसरा उमेदवार निवडून आला” 

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यसभा निवडणुकी महाविकास आघाडी सरकारने तीन उमेदवार उभे केले. त्यावेळी आम्हाला महाविकास आघाडी सरकारकडून ऑफर देण्यात आली की, तिसरा उमेदवार परत घ्या. त्यावेळी आम्ही विनम्रपणे सांगितले की, भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यसभा सदस्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. देशाची पॉलिसी पंतप्रधान मोदी चालवतात या पॉलिसी मेकिंगमध्ये राज्यसभा सदस्य एक महत्वाचा घटक असल्यामुळे आपण जसं म्हणता त्याच्या उलट आपण करा. त्यावेळी पक्ष म्हणून आमच्याकडे सर्वाधिक मतं असल्याचे सांगितले होते. मात्र हे सरकार आघाडी आणि अपक्षांच्या आधारावर बोलत होते. तरी त्यांनी आमचं मत ऐकलं नाही. यामुळे आमचा तिसरा उमेदवार निवडून आला, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.

“अनिल देशमुख, नवाब मलिकांचे वर्क फ्रॉम जेल”

“एकीकडे संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची बेल रद्द झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवतात. केवळ मंत्रिमंडळात ठेवत नाही, अजूनही त्यांच्या विभागाचे निर्णय फोटोसहित जाहीर करतात. म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी वर्क फ्रॉम जेल अशी परिस्थिती दिसतेय,” असा आरोप करत फडणवीस पुढे म्हणाले की, “अकांडतांडवा करण्याचे तंत्र महाविकास आघाडीच्या घटकांनी विकसित केला आहे. त्या अकांडतांडवाचा काल पर्दाफाश झाला आहे”. असही ते म्हणाले.

“महाविकास आघाडी सरकार अंतरविरोधाने भरलेलं सरकार”

“महाविकास आघाडी सरकार अंतरविरोधाने भरलेलं सरकार आहे. तो अंतरविरोध त्यांच्या प्रतिक्रियेतच दिसतोय, सगळे एकमेकांवर दोषारोप करत आहेत. प्रत्येकाला वाटतंय दुसऱ्यावर दोष टाकून बाजूला व्हा, त्यांचं एक मत बाद झालं नसतं… जरी नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळाली असती तरीही भाजपचं निवडणून आली असती एवढे आम्ही खात्रीदार आहोत. असा दावाही फडणवीसांनी केला आहे. सरकारच्या आमदारामध्ये अस्वस्थता आहे. कारण ज्यावेळी सरकारचं काम थांबलेलं असत आणि काहीच काम होत नाही तेव्हा तो राग आमदारांना फेस करावा लागतो”, असही फडणवीस म्हणाले.


भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल