घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा वरचष्मा; मविआला मोठा धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा वरचष्मा; मविआला मोठा धक्का

Subscribe

भाजपच्या विठ्ठल देसाई यांनी ईश्वरचिठ्ठीच्या मदतीनं विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केलाय. तर भाजपच्या अतुल काळसेकरांनी मविआच्या विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवींना पराभवाची धूळ चारली. तर दुसरीकडे राजन तेलींचा वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी पराभव केलाय.

सिंधुदुर्गः गेल्या काही दिवसांपासून कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू होती. जिल्हा बँक पुन्हा नारायण राणेंच्या ताब्यात जाणार की महाविकास आघाडी सत्ता मिळवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा एकदा राणेंच्या पर्यायानं भाजपच्या ताब्यात आलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत दोन दिग्गज पराभूत झालेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा पराभव झालाय. १४-५ च्या फरकाने भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनलने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दणदणीत विजय मिळवला असून, सहकार समृद्धी पॅनलचा धुव्वा उडालाय.

भाजपच्या विठ्ठल देसाई यांनी ईश्वरचिठ्ठीच्या मदतीनं विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केलाय. तर भाजपच्या अतुल काळसेकरांनी मविआच्या विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवींना पराभवाची धूळ चारली. तर दुसरीकडे राजन तेलींचा वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी पराभव केलाय. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था या मतदारसंघातून भाजपच्या राजन तेलींचा पराभव झालाय. राजन तेली यांचा पराभव करणारे सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे चुलत बंधू आहेत. आतापर्यंत १९ जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. त्यातील पाच जागा महाविकास आघाडील सरकारला, तर १४ जागा भाजपनं जिंकल्यात. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये ११५ महिला व ८५३ पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नव्हतं.

- Advertisement -

१. शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका
प्रकाश गवस (भाजप) पराभूत

गणपत देसाई (महावि. आघा.) विजयी

- Advertisement -

२. शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका
प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत

विद्याप्रसाद बांदेकर (महावि. आघा.)- विजयी

३. शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका
प्रकाश बोडस (भाजप)- विजयी

अविनाश माणगावकर (महावि. आघा.)- पराभूत

४. शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका
सतीश सावंत (महावि. आघा.)- पराभूत
विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी

५. मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ
महेश सारंग (भाजप)- विजयी

मधुसूदन गावडे (महावि. आघा.)- पराभूत

६. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ
अतुल काळसेकर (भाजप)- विजयी

सुरेश दळवी (महावि. आघा.)- पराभूत

७. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ
राजन तेली (भाजप)- पराभूत

सुशांत नाईक (महावि. आघा.)- विजयी

८. विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था
विनोद मर्गज (महावि. आघा.)- पराभूत

संदीप परब (भाजप)- विजयी

९. कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ (एकुण मतदान)
विकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत
समीर सावंत (भाजप)-विजयी

१०. शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी
दिलीप रावराणे (भाजप) विजयी
दिगंबर पाटील (महावि. आघा.)- पराभूत

११. भाजपचे मनिष दळवी विजयी
महाविकास आघाडीचे विलास गावडेंचा पराभव

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -