घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पदवीधरसाठी भाजपाच अखेर ठरलं; यांचं करणार 'काम'

नाशिक पदवीधरसाठी भाजपाच अखेर ठरलं; यांचं करणार ‘काम’

Subscribe

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक आता दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि या अनुषंगाने आता भारतीय जनता पार्टीने आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा किंवा कुठल्या उमेदवारासाठी काम करायचं याबाबतच्या सूचना या बैठकीत दिल्याचं समोर येत आहे. आणि या बैठकीमध्ये अपक्ष उमेदवार व काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे यांच्यासाठी काम करा अशा प्रकारचे आदेश देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती सूत्रांच्या आधारे समोर येताना दिसत आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही घोषित झाल्यापासूनच त्याबाबत अनेक ट्विस्ट आणि अनेक तर्कवितर्क तसेच अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे अधिकृत उमेदवारी मिळालेले डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करताच मी सर्व पक्षांचा आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टीचा देखील पाठिंबा मागणार आहे. अशा प्रकारचे विधान त्यांनी केल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली यासोबत भारतीय जनता पार्टीने देखील आपला कुठलाही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत उतरवला नाही. त्यामुळे एक नवा ट्विस्ट निर्माण झाला सत्यजित तांबे हे भाजपचेच उमेदवार आहेत अशा पद्धतीची भावना एकूणच राजकीय वर्तुळात तयार झाली.

- Advertisement -

खरंतर या सर्व घडामोडीनंतर सुद्धा अनेक ट्विस्ट या निवडणुकीमध्ये आले. ज्यामध्ये खरंतर भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठींब्याची मागणी केली. काँग्रेससाठी सोडलेला नाशिक पदवीधर मतदार संघावर शिवसेनेने दावा दाखल केला आणि शेवटी नागपूरची जागा काँग्रेसला आणि नाशिकची जागा ही शिवसेनेला सोडण्याचं महाविकास आघाडीमध्ये ठरलं. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शेवटच्या टप्प्यापर्यंत देखील कोणालाच पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. नेमकं भाजप कोणाच्या मागे उभा राहणार आणि सत्यजित तांबे अद्यापही भाजपकडे पाठिंबा का मागत नाहीये. यामुळे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. त्यातच निवडणूक तिच्या प्रचार संपण्याचा शेवटचा दिवस आणि निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असतानाच भारतीय जनता पार्टीच्या नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक बैठक घेतली ऑनलाइन स्वरूपात झालेल्या या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर सत्यजित तांबे यांचे छुप्या पद्धतीने काम करण्याचे आदेश त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर येत आहे.

यामुळे आता भाजपचा पाठिंबा हा सत्यजित तांबे यांनाच असणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. खरं तर ही निवडणूक अनेक ट्विस्ट आणि विविध घडामोडींमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली होती. अखेरच्या क्षणी भाजपने छुप्या पद्धतीने सत्यजित तांबे यांचा मागे उभे राहण्याचं ठरवल्याने आता निवडणुकीच्या दिवशी काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -