Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी BJP Flag : भाजपाचा झेंडा मराठी माणसाचा नाही; संजय राऊतांचा टोला

BJP Flag : भाजपाचा झेंडा मराठी माणसाचा नाही; संजय राऊतांचा टोला

Subscribe

'मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकेल असं जे.पी. नड्डांपासून इतर सगळे नेते म्हणत असतील, तर स्वतःला शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत', असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

‘मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकेल असं जे.पी. नड्डांपासून इतर सगळे नेते म्हणत असतील, तर स्वतःला शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत’, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय, ‘भाजपाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही’ असेही राऊत म्हणाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नव वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bjp Flag Is Not Marathi People Flag Said Thackeray Group Mp Sanjay Raut)

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि भाजपावर निशाणा साधला. मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकेल असे जे.पी. नड्डांपासून इतर सगळे नेते म्हणत असतील, तर स्वतःला शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत, त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच, “भाजपाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही. हा व्यापाऱ्यांचा आणि शेठजींचा झेंडा आहे. ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, अशा विचारांच्या लोकांचा हा झेंडा आहे”, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – MP Sanjay Raut : मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, पण जनतेच्या ‘या’ प्रश्नांचं उत्तर कधी देणार? राऊतांचा सवाल

यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा फुटलेला गट गप्प का? युतीचा काय? आम्ही म्हणतो शिवसेनेचा झेंडा फडकेल आम्ही उघडपणे सांगतो आहोत. तुम्ही गप्प का बसला आहात शेपूट घालून? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला. “मुंबई, ठाणे, नागपूर अशा १४ महापालिकांच्या निवडणुका का घेत नाही? निवडणुका घेतल्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल”, असेही संजय राऊत म्हणाले. शिवाय, या निवडणुका घेण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट का धजावत नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आपचे अरविंद केजरीवाल, जनता दलाचे नितीश कुमार, राष्ट्रवादीचे शरद पवार तर, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याकरता बैठकसत्रांना सुरुवात केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : आता कोणत्या पक्षात जाणार? कीर्तिकरांना राऊतांचा सवाल

बिहारच्या पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत. याबाबत पत्रकारांनी आज संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावेळी “आम्ही त्याला विरोधी पक्ष म्हणत नाही. देशभक्त म्हणतो. या देशावर हुकुमशाहीचे संकट येत आहे. देशात लोकशाही, संविधानविरोधी काम सुरू आहे. त्यामुळे देशभक्त एकत्र येत आहेत. आमचा संविधानाला विरोध नाही. समविचारी पक्ष पाटण्यात एकत्र येतील, नितीश कुमार पुढाकार घेत आहेत. ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहतील”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -