भंडाऱ्यात काँग्रेस तर गोंदियात भाजप, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादीला येथे १३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

bjp get highest number on seat in zp lead in gondia and congress in bhandara
भंडाऱ्यात काँग्रेस तर गोंदियात भाजप, जिल्हा परिषद निआवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस तर गोंदियात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. राज्यतील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला येथे अपयश आले असून सेनेला भंडारा जिल्हा परिषदेत जेमतेम खाते उघडता आले आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्पात मतदान झाले होते. या दोन्ही जिल्हा परिषदांच्या १०५ जागांसाठी आज मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. भाजपने नगर पंचायत निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही बाजी मारली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी २६ जागा खिशात घालून भाजपने येथे आपला झेंडा फडकवला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे होम ग्राउंड असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसला ५२ पैकी २१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादीला येथे १३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ

भंडारा : एकूण जागा ५२

भाजप : १२, काँग्रेस: २१, राष्ट्रवादी : १३, शिवसेना : १, अपक्ष : ४

गोंदिया : एकूण जागा ५३

भाजप : २६, काँग्रेस : १३, राष्ट्रवादी :८, शिवसेना :०, इतर आणि अपक्ष: ०६

नगर पंचायत निवडणूक निकाल

एकूण जागा : १८०२, निकाल जाहीर : १७९१

पक्षीय बलाबल

भाजप : ४१९, राष्ट्रवादी : ३९१, काँग्रेस : ३४४, शिवसेना : २९६, सीपीआयएम : ११, बसप : ०४, मनसे : ०४, नोंदणीकृत पक्ष :९०, अपक्ष : २३९


हेही वाचा : भाजपला जास्त जागा मिळाल्याने तुमची नशा उतरली असेल, भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल