शिवसेना आमदारांच्या बंडामागे भाजपाचा हात नाही : सुधीर मुनगंटीवार

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचे आरोप वारंवार शिवसेनेकडून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता य आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, आज भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहेत.

sudhir mungantiwar

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचे आरोप वारंवार शिवसेनेकडून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता य आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, आज भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहेत. “भाजपाचा कोणताही हात नसून, भारतीय जनता पार्टीला दोष देण्याचे दुर-दुर पर्यंत कारण नाही. त्याशिवाय, भारतीय जनता पार्टीच्याबाबत अशाप्रकारचे अपशब्द काढून निश्चितपणे तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात”, असे त्यांनी म्हटले. (BJP has no part in Shiv Sena MLAs revolt Sudhir Mungantiwar)

प्रसारमाध्यमांशी बातचित करताना भाजपा नेते सुधिर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, ”भारतीय जनता पार्टीला दोष देण्याचे दुर-दुर पर्यंत कारण नाही. नाचता येईना अंगण वाकडे… तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही, आणि सांगायचे भारतीय जनता पार्टीने फुस लावली. थोडी तरी जनाची नाही तर, मनाची ठेवा. अरे तुमची चुक झाली असेल, तुम्ही जर गर्वात असाल, अहंकारात असाल, घमेंड तुमच्यात भरभरून होती. त्यामुळे आमदारांनी काही भुमिका घेतली असेल, दोष भारतीय जनता पार्टीला कशाला देताय.”

“कोणाच्या नावाने कोणी मत मागितली ही २०१९च्या निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे. आदित्य ठाकरे यांनीही कोणा-कोणाच्या नावानी वरळी विधानसभा मतदारसंघात मते मागितली हे साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे कोणी कोणाच्या नावाने मते मागायची. जनतेनी कोणाला मते द्यायची. हा जनतेचा अधिकार आहे. कधीतरी दानवांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णू वराह अवतारात आले होते. आता तुम्ही मान्यच केलेय की, चाळीस वराह तिकडे गेले. तर एका वराहने पृथ्वीला वाचवले तर, ४० वराह महाराष्ट्र वाचवतील. तुम्ही रोज अतिशय निम्न शब्दांमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थर हा कधी नवे इतक्या खाली नेण्याचा प्रयत्न करतात.”, असे त्यांनी म्हटले.

बंडखोरांना सुरक्षा दिली जाते पण काश्मिरी पंडितांना सुरक्षा केंद्राकडून दिली जात नाही असे आदित्य ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात म्हटले. याबाबत मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सरकार जात असताना आता काश्मिरी पंडित आठवेल, स्वातंत्र्यवीर सावरकर आठवतील, सरजे उस्मानी वाईट होताहेत हे आठवेल, अशा अनेक गोष्टी आठवतील. सरकारमध्ये असताना काश्मिरी पंडितांबाबत काही भुमिका घेतली नाही. ९५ ते ९९ जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टीने प्रस्ताव ठेवला आणि महाविद्यालयात आरक्षण दिले.


हेही वाचा – ‘एका बापाचे असाल तर राजीनामा द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान